Skin care : त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आवळा पावडरपासून ‘हे’ फेसपॅक तयार करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

| Updated on: Feb 07, 2022 | 1:27 PM

आवळा केवळ आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी अनेक प्रकारे आरोग्यदायी आहे. याच्या मदतीने त्वचेवरील काळे डाग, लालसरपणा आणि सुरकुत्या कमी होऊ शकतात.

1 / 5
आवळा केवळ आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी अनेक प्रकारे आरोग्यदायी आहे. याच्या मदतीने त्वचेवरील काळे डाग, लालसरपणा आणि सुरकुत्या कमी होऊ शकतात. तसेच ते त्वचेला मॉइश्चरायझ करते. विशेष म्हणजे आपण घरच्या-घरी आवळ्याचा फेसपॅक तयार करू शकतो.

2 / 5
एक चमचा आवळा पावडरमध्ये एक चमचा हळद मिसळा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या पेस्टमध्ये गुलाब पाणी देखील घालू शकता. ही पेस्ट थोडा वेळ ठेवा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. सुमारे 15 मिनिटे राहू द्या. चेहरा धुण्यासाठी फक्त थंड पाण्याचा वापर करा. हा पॅक लावून चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करता येतात.

3 / 5
एक चमचा मध आणि एक चमचा आवळा पावडर मिसळून फेसपॅक तयार करा. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि काही मिनिटे बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. 15-20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

4 / 5
एक चमचा आवळा पावडरमध्ये दोन चमचे पाणी मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट साधारण वीस मिनिटे आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवा.

5 / 5
ग्रीन टी त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. तयार केलेली ग्रीन टी दोन चमचे घ्या आणि आवळा पावडरमध्ये मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपला चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्याची मालिश करा. वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.