AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer skin care: गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये या गोष्टी मिसळून बनवा फेसपॅक, त्वचा तजेलदार होईल!

गुलाब (Rose) आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. गुलाब पाण्याच्या मदतीने आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. इतकेच नाहीतर गुलाब पाण्यामुळे आपली त्वचा (Skin) सुंदर होण्यासही मदत होते. आपल्या त्वचेसाठी फक्त गुलाब पाणीच नव्हेतर गुलाबाच्या पाकळ्या देखील खूप फायदेशीर आहेत.

Summer skin care: गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये या गोष्टी मिसळून बनवा फेसपॅक, त्वचा तजेलदार होईल!
गुलाबाच्या पाकळ्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत.Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 10:29 AM
Share

मुंबई : गुलाब (Rose) आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. गुलाब पाण्याच्या मदतीने आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. इतकेच नाहीतर गुलाब पाण्यामुळे आपली त्वचा (Skin) सुंदर होण्यासही मदत होते. आपल्या त्वचेसाठी फक्त गुलाब पाणीच नव्हेतर गुलाबाच्या पाकळ्या देखील खूप फायदेशीर आहेत. सहसा आपण गुलाबाचे फुल देवासाठी किंवा डेकोरेशनसाठी वापरतो. मात्र, गुलाबाच्या पाकळ्यांच्या मदतीने आपण अनेक प्रकारचे फेसपॅक (Facepack) देखील तयार करून त्वचेची काळजी घेऊ शकतो. हे फेसपॅक घरच्या-घरी कसे तयार करायचे याबद्दल जाणून घेऊयात.

  1. बेसन आणि गुलाबाच्या पाकळ्या- हा पॅक बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि बेसन व्यतिरिक्त तुम्हाला मध आणि दहीही लागेल. हा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. एका वाटी घ्या आणि त्यात गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून पेस्ट तयार करा. पेस्टमध्ये मध, दही आणि बेसनही मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारण 30 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. हे सर्व घटक त्वचेला हायड्रेट आणि मुलायम ठेवण्यास मदत करतात.
  2. चंदन आणि गुलाबाच्या पाकळ्या- चंदनापासून बनवलेले स्किन केअर प्रोडक्ट्स उन्हाळ्यात खूप फायदेशीर मानले जातात. दुधाच्या मदतीने गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवा आणि त्यात चंदन पावडर घाला. त्यात थोडं थंड पाणी टाका आणि हा पॅक हलक्या हातांनी चेहऱ्याला लावा. इतर पॅकप्रमाणेच हा पॅक चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
  3. गुलाब पाकळ्या आणि नारळ तेल- हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी 2 चमचे नारळ तेल घ्या आणि 5 चमचे गुलाब पाकळ्यांची पेस्ट घ्या.1 चमचे लव्हेंडर तेल आणि 1 चमचे दही लागेल. हे सर्व घटक मिक्स करून चांगली पेस्ट बनवा. संपूर्ण चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. सुमारे 15-20 मिनिटांसाठी हा पॅक चेहऱ्यावर राहूद्या. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.
  4. मध आणि गुलाबाच्या पाकळ्या- मध आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. गुलाब पाकळ्या आणि मधापासून आपण खास पॅक चेहऱ्यासाठी वापरू शकता. दुधाच्या मदतीने गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून पेस्ट बनवा आणि एका भांड्यात ठेवा. आता त्यात दोन चमचे मध घालून हा पॅक चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे असेच राहू दिल्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. थंड पाण्याने चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Olive Oil Benefits : ऑलिव्ह ऑईल त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा महत्वाची माहिती!

Breakfast: नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा, परंतु नाश्त्यामध्ये काय खावे आणि काय नाही, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली