Skin Care Tips : चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवायच्या आहेत?; वाचा चिंच उपयोगी कशी?

चिंच खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चिंचेचा वापर वृद्धत्व विरोधी त्वचेसाठी केला जाऊ शकतो. अल्फा हायड्रॉक्सी अॅसिडचा एक मोठा स्त्रोत चिंचेमध्ये असतो.

Skin Care Tips : चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवायच्या आहेत?; वाचा चिंच उपयोगी कशी?
फेसपॅक
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 12:50 PM

मुंबई : चिंच खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चिंचेचा वापर वृद्धत्व विरोधी त्वचेसाठी केला जाऊ शकतो. अल्फा हायड्रॉक्सी अॅसिडचा एक मोठा स्त्रोत चिंचेमध्ये असतो. चिंचेमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. ही जीवनसत्त्वे सुरकुत्या कमी करण्यासाठी ओळखली जातात. वृद्धत्व टाळण्यासाठी आपण चिंचेचा वापर कसा करू शकता ते जाणून घेऊया. (Tamarind’s face pack is beneficial for reducing facial wrinkles)

एक चमचा चिंचेचा रस आणि थोडे खोबरेल तेल वापरून मिश्रण तयार करा. आपल्या बोटांनी आपला चेहरा आणि मान मसाज करा. साध्या पाण्याने धुण्यापूर्वी 10-15 मिनिटे त्वचेवर सोडा. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी हा उपाय आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करा. चिंच आणि अंडी मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटे सोडा. त्यानंतर ताज्या थंड पाण्याने धुवा.

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी चिंच, लिंबाचा रस आणि मध एकत्र मिक्स करा. त्यानंतर ते काही वेळासाठी भिजवू घाला आणि मऊ होऊपर्यंत ठेवा. एक चमचा चिंचेचा कोळ घ्या आणि त्यात एक चमचा ताजे लिंबाचा रस आणि कच्चा मध घाला आणि चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. आपल्या बोटांनी हलक्या हाताने मालिश करा आणि त्वचेवर 15-20 मिनिटे सोडा. यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

आपण आठवड्यातून दोनदा हा अँटी एजिंग चिंचेचा फेस मास्क पुन्हा करू शकता. पिकलेल्या केळीचे काही जाड काप सोलून घ्या आणि केळ्याचा लगदा तयार करण्यासाठी ब्लेंडरचा वापर करा. त्यानंतर केळीच्या पेस्टमध्ये चिंचेचा रस मिक्स करा. आता ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मालिश करा. 15-20 मिनिटे त्वचेवर सोडा. धुण्यासाठी स्वच्छ पाणी वापरा. तुम्ही हा फेस मास्क आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Tamarind’s face pack is beneficial for reducing facial wrinkles)

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.