Hacks For Skin Glow : सुपर हेल्दी स्किन मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

आता सणासुदीच्या काळात महिला सौंदर्य उपचार, फेसपॅक, फेस मास्क, केसांना रंग आणि कंडिशनिंग इत्यादीसाठी पार्लर आणि स्पामध्ये जातात. मात्र बऱ्याच वेळा सणांच्या या धावपळीमध्ये महिलांना स्पा आणि पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही या सर्व गोष्टी स्वतः घरी करू शकता.

Hacks For Skin Glow : सुपर हेल्दी स्किन मिळवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की करा!
त्वचेची काळजी
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 9:30 AM

मुंबई : आता सणासुदीच्या काळात महिला सौंदर्य उपचार, फेसपॅक, फेस मास्क, केसांना रंग आणि कंडिशनिंग इत्यादीसाठी पार्लर आणि स्पामध्ये जातात. मात्र बऱ्याच वेळा सणांच्या या धावपळीमध्ये महिलांना स्पा आणि पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही फेसपॅक, फेस मास्क, केसांना रंग आणि कंडिशनिंग या सर्व गोष्टी स्वतः घरी करू शकता.

केळीचा फेस मास्क

केळी खायला खूप पौष्टिक असली तरी त्वचेसाठी फायदेशीर आहे. केळी जीवनसत्त्वे B6, B12, अँटिऑक्सिडंट्स आणि झिंकने समृद्ध आहे. केळीच्या सालीच्या मदतीने आपण मास्क तयार करू शकतो. अर्धी केळी घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा. केळीची साल मिक्सरच्या मदतीने बारीक करून घ्या. गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत ते चांगले मिसळा. त्यात एक चमचा मध आणि दही घाला. या फेस मास्कमध्ये तुम्ही गुलाब पाणी देखील घालू शकता. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. काही मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

डार्क सर्कल दूर करण्यासाठी 

बटाट्याच्या दोन कापांवर कोरफडीचा गर लावा. त्यानंतर हे काप डोळ्यांवर ठेवा. साधारण 20 मिनिटे हे डोळ्यांवर राहूद्या. बटाटा डार्क सर्कल हलकी करेल आणि कोरफड जळजळ शांत करते.

कॉफी आणि कडुलिंबाच्या तेलाचा स्क्रब

यासाठी तुम्हाला 2 टेबलस्पून ग्राउंड कॉफी आणि 2 टेबलस्पून कडुलिंबाचे तेल लागेल. कडुलिंबाच्या तेलात ग्राउंड कॉफी मिसळून चांगली पेस्ट तयार करा. किमान पंधरा मिनिटे तसेच राहू द्या. चेहरा आणि मानेवर फेस स्क्रबने हळूवारपणे मसाज करा. पाच ते दहा मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

एक ताजे लिंबू घ्या आणि त्याची साल किसून घ्या. कढईत तीन लिटर पाण्यात किसलेली साल उकळूद्या. उकळी आल्यावर गॅस बंद करा. थोडे थंड होऊ द्या. आता पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर घाला. यामध्ये आपले पाय किमान 15-20 मिनिटे ठेवा. यामुळे आपल्या पायांवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(This home remedy is beneficial for getting super healthy skin)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.