Weekend Trip | वीकेंडला भटकंतीचा प्लॅन बनवताय? मुंबईजवळची ‘ही’ ठिकाण तुमची वाट पाहतायत!

| Updated on: Jan 15, 2021 | 5:38 PM

वीकेंडसाठी अशीची जवळची निवांत ठिकाणं शोधत असाल, तर मुंबईपासून जवळच असणाऱ्या ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

Weekend Trip | वीकेंडला भटकंतीचा प्लॅन बनवताय? मुंबईजवळची ‘ही’ ठिकाण तुमची वाट पाहतायत!
Follow us on

मुंबई : नवीन वर्षाचे आगमन झाले आहे. नव्या वर्षात नवी-जुनी सगळीच कामे पुन्हा एकदा जोमाने सुरु झाली आहेत. आठवडाभराचे दगदगीचे आयुष्य आणि काम यातून उसंत मिळणारे दिवस म्हणजे ‘वीकेंड’. काहींना रविवार, तर काहींना शनिवार-रविवारच्या दिवशी सुट्टी असते. आता या दिवशी तरी रोजच्या रुटीनमधून बाहेर पडून कुठेतरी निवांत वेळ घालवावा आणि मनसोक्त भटकंती करायला मिळावी अशी जवळची ठिकाणं शोधण्यास सुरुवात करतात. तुम्ही देखील या वीकेंडसाठी अशीची जवळची निवांत ठिकाणं शोधत असाल, तर मुंबईपासून जवळच असणाऱ्या ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या! (Best Weekend trip places near Mumbai)

कोलाड :

महाराष्ट्रातील साहसी क्रीडाप्रकारांचे केंद्रस्थान असलेले रायगड जिल्ह्यातील कोलाड हे ठिकाण कुंडलिका नदीमधील वॉटर राफ्टिंग आणि ट्रेकिंगच्या पायवाटांसाठीही प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले व मुंबईपासून 121 किमी अंतरावरील ‘कोलाड’ हे नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले असते. कॅनोइंग, कायाकिंग, पॅराग्लायडिंग, रॅपलिंग, रॉक क्लायम्बिंग आणि रिव्हर झिप लाईन क्रॉसिंग असे अनेक साहसी खेळ येथे अनुभवता येतात.

कर्नाळा :

कर्नाळ्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर इथे पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग आणि कर्नाळा किल्ला भ्रमंती करता येते. पनवेलपासून 12 किमी अंतरावर असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य 12.11 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. इथे स्थानिक पक्ष्यांच्या 150 प्रजातींचे व स्थलांतरित पक्ष्यांच्या 37 प्रजातींचे निवासस्थान आहे. कर्नाळा किल्ल्याची निर्मिती देवगिरीच्या यादवांनी केली होती व नंतर हा किल्ला तुघलकाने काबीज केले होते. कर्नाळ्याच्या टोकावर पोहोचल्यानंतर येथून मुंबईचे विहंगम दृश्य दिसते (Best Weekend trip places near Mumbai).

मांडावा :

गेटवे ऑफ इंडियापासून बोटीने मुंबईपासून 102 किमी अंतरावर असलेले समुद्रकिनाऱ्यावरील हे उबदार गाव मांडवा आपल्या चमकदार समुद्रतटांसाठी, स्वादिष्ट मेजवानीसाठी व जलक्रीडांसाठीही प्रसिद्ध आहे. जर आपण वीकेंड साजरा करण्यासाठी इथे जाण्याचा विचार करत असाल तर हे निवांत गाव बघत, जुन्या आरसीएफ जेट्टीच्या आसपासच्या परिसरात मनसोक्त डुंबण्याचा घेत, मांडवाच्या किनाऱ्यावर पायी चालत व स्थानिक कोळी लोकांसोबत संवाद साधत आपण आपला दिवस मनमुरादपणे जगू शकता.

एलिफंटा बेट :

गेटवे ऑफ इंडियापासून फेरीद्वारे एक तास अंतरावर असलेले एलिफंटा बेट हे मुंबईपासून 10 किमी पूर्वेस आहे. याठिकाणी हाताने कोरलेल्या भिंतीवरील चित्रांच्या सात प्राचीन लेण्या आहेत. ज्या अजिंठा व वेरुळच्या लेण्यांशी मिळत्या-जुळत्या आहेत. या लेण्या बघितल्यानंतर आपण कॅनॉन हिलवर चढू शकता, या शिखरावर एक जुनी तोफ ठेवलेली आहे.

अॅम्बी व्हॅली :

आरामदायक सहलीसाठी पैसे खर्च करण्याची तयारी असणाऱ्यांसाठी अॅम्बी व्हॅली हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. 10,000 एकरावर पसरलेल्या या लक्झरी रिसॉर्टमध्ये इनडोअर व आऊटडोअर धमाल करण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. मुंबईपासून 105 किमी अंतरावर असलेल्या या अॅम्बी व्हॅली रिसॉर्टमध्ये एक 7 स्टार रेस्टॉरंट, एक 18 होल्सचे गोल्फ कोर्स, अत्याधुनिक वॉटर पार्क व मुलांसाठी एक विशेष मैदान आहे.

(Best Weekend trip places near Mumbai)

हेही वाचा :