महिलांनो रोज लिपस्टिक लावत असाल तर सावधान! हे 5 गंभीर परिणाम जाणून धक्का बसेल

लिपस्टिक लावणे हा सौंदर्याचा महत्त्वाचा भाग. यामुळे ओठांचे सौंदर्य तर वाढतेच पण मेकअप लूकही पूर्ण होतो. पण दररोज लिपस्टिक लावण्यामुळे आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतात याची कल्पनाही आपल्याला नसते. चला जाणून घेऊयात, लिपस्टिक लावल्यामुळे नक्की आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतात ते.

महिलांनो रोज लिपस्टिक लावत असाल तर सावधान! हे 5 गंभीर परिणाम जाणून धक्का बसेल
Daily Lipstick Dangers, 5 Serious Health Risks You Need to Know
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2025 | 3:26 PM

लिपस्टिक म्हटलं की श्रृंगारातील महिलांचा आवडती मेकपची वस्तू. अनेकींना तर लिपस्टिकचे कलेक्शन करणे प्रचंड आवडते. लिपस्टिक लावणे आजकाल प्रत्येक महिलेच्या मेकअप रूटीनचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ऑफिसला जाणे असो, पार्टीला जाणे असो लिपस्टिक चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते हे नक्की. पण तुम्हाला माहिती आहे का की दररोज लिपस्टिक लावण्याची सवय हळूहळू आरोग्याला हानी पोहोचवू शकते?

लिपस्टिकमध्ये असे अनेक हानिकारक रसायने असतात, ज्याचा तुमच्या ओठांवरच नव्हे तर संपूर्ण शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. रोज लिपस्टिक लावण्याची सवय किती घातक ठरू शकते आणि त्यामुळे होणार गंभीर परिणाम काय चला जाणून घेऊयात.

लिपस्टिकमध्ये शिसे असते

बहुतेक लिपस्टिकमध्ये शिसे नावाचा हानिकारक धातू असतो, जो हळूहळू शरीरात जमा होऊ लागतो आणि हार्मोनल असंतुलन, प्रजनन समस्या आणि मानसिक विकासात अडथळा निर्माण करू शकतो. लिपस्टिक वारंवार लावल्याने आपण काही खाताना, जेवताना किंवा अगदी पाणी पिताना देखील थोडी थोडी लिपस्टिक आपल्या पोटात जाते आणि त्याद्वारे हे रसायन शरीरात जाते ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

ओठ काळे आणि कोरडे होऊ शकतात.

लिपस्टिकमध्ये असलेले रसायने आणि प्रिजर्वेटिव्स ओठांमधील ओलावा काढून टाकू शकतात, ज्यामुळे ते हळूहळू कोरडे, फाटलेले आणि काळे होऊ शकतात. जर तुम्ही दररोज लिपस्टिक लावली तर कालांतराने तुमचे ओठ त्यांचा नैसर्गिक गुलाबीपणा गमावून बसतात.

शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात

लिपस्टिकमध्ये पॅराबेन्स, कॅडमियम आणि क्रोमियम सारखी अनेक प्रकारची रसायने असतात, जी शरीरात हळूहळू विषबाधा निर्माण करू शकतात. या घटकांमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. लिपस्टिकच्या सतत संपर्कात राहिल्याने हे विषारी पदार्थ शरीरात जमा होऊ शकतात.

ऍलर्जी आणि त्वचेच्या संसर्गाचा धोका

लिपस्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळे काही लोकांना ओठांवर ऍलर्जी, खाज सुटणे आणि जळजळ होण्याची शक्यता असते. विशेषतः जर तुम्ही स्वस्त किंवा लोकल शॉपमधून घेतलेली लिपस्टिक वापरत असाल तर त्यामुळे त्वचेचा संसर्ग देखील होऊ शकतो.

पचनक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो

तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही लिपस्टिक लावता तेव्हा ती दिवसभर हळूहळू तुमच्या पोटात जात असते. लिपस्टिकमधील हानिकारक रसायने खाताना आणि पिताना पोटात जातात. त्यामुळे यकृत आणि पोटाला नुकसान पोहोचवू शकतात , ज्यामुळे पचनसंस्था कमकुवत होऊ शकते.

लिपस्टिक लावताना काय काळजी घ्यावी की ज्यामुळे दुष्परिणाम टाळता येतील? चला जाणून घेऊयात.

नैसर्गिक गोष्टींपासून बनलेली आणि हर्बल लिपस्टिक वापरा.

लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लिप बाम किंवा खोबरेल तेल लावा.

झोपण्यापूर्वी ओठांवर लावेली लिपस्टिक पूर्णपणे स्वच्छ करा जेणेकरून रसायने ओठांवर राहणार नाहीत.

दररोज लिपस्टिक लावणे टाळा आणि कधीकधी नैसर्गिक लूक द्या

किंवा ज्यामध्ये नैसर्गिक रंग मिक्स केलेले असतील, किंवा जो पूर्णपण हर्बल असेल असा लिप बामही तुम्ही लावू शकता. कारण त्यातही आता वेगवेगळे रंग येतात. त्यामुळे लिपस्टिक लावण्यापेक्षा तुम्ही तेही लावू शकता.