AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, युद्धात एकटे पडले, एका राजीनाम्यामुळे अमेरिकेत मोठा भूकंप

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. ते आता अमेरिकेतही एकटे पडल्याचं पहायला मिळत आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, युद्धात एकटे पडले, एका राजीनाम्यामुळे अमेरिकेत मोठा भूकंप
donald trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 8:13 PM
Share

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ले सुरूच आहेत. आज देखील इस्त्रायलकडून इराणवर मोठा एअर स्ट्राईक करण्यात आला. या एअर स्ट्राईकमध्ये  इराणचा नंबर दोनचा सर्वात पावर फूल नेता अली लारिजानी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे इराणकडून मात्र इस्त्रायलचा हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे.  दरम्यान दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिकेच्या सैन्य तळांवर मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे अनेक सैनिक मारले गेले असून, अमेरिकेचं मोठं नुकसान झालं आहे.

मिसाईल हल्ल्यांची इस्त्रायलमध्ये दहशत  

दरम्यान दुसरीकडे इराणने इस्त्रायलवर मिसाईलचा मारा सुरूच ठेवला आहे. इस्त्रायलच्या अनेक भागांमध्ये इराणने मिसाईल हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इस्त्रालयचं आतापर्यंत प्रचंड नुकसान झालं आहे. इराणकडून इस्त्रायलच्या पंतप्रधानांचं कार्यालय देखील लक्ष्य करण्यात आलं. दरम्यान एकीकडे इराणने आपल्या मिसाईल हल्ल्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलच्या मनात धडकी भरवली असातनाच एक मोठी बातमी समोर येत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे, अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर आणि दहशतवादविरोधी केंद्रांचे संचालक जोसेफ केंट यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत, त्याचा निषेध म्हणून आपला राजीनामा दिला आहे.  इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नसताना अमेरिकेनं इराणसोबत युद्ध सुरू केलं असा आरोप जोसेफ केंट यांनी केला आहे.  जोसेफ केंट यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धाच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे, त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.  दरम्यान युद्ध सुरू असतानाच एवढ्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याने अचानक राजीनामा दिल्यामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे होमूर्ज सामुद्रधुनीच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन करण्यासाठी एकही देश पुढे आलेला नसतानाच आता ट्रम्प यांना अमेरिकेतून देखील मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल