डार्क चॉकलेट कॉफी! भारी ना? कशी बनवायची ? वाचा

आज आम्ही तुमच्यासाठी डार्क चॉकलेट कॉफी बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. हे चॉकलेटचे नवीन चवीचे पेय आहे. डार्क चॉकलेटमध्ये बरेच गुणधर्म असतात जे आपला मूड सुधारण्यास मदत करतात.

डार्क चॉकलेट कॉफी! भारी ना? कशी बनवायची ? वाचा
Dark chocolate
| Updated on: May 04, 2023 | 4:29 PM

मुंबई: चॉकलेट हा एक गोड पदार्थ आहे जो लहान मुले आणि प्रौढांना वेड लावतो. त्यामुळे चॉकलेटपासून बनवलेले पदार्थ सर्वांनाच खूप आवडतात. यातील एक पदार्थ म्हणजे डार्क चॉकलेट कॉफी, जी चवदार तसेच हेल्दी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी डार्क चॉकलेट कॉफी बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. हे चॉकलेटचे नवीन चवीचे पेय आहे. डार्क चॉकलेटमध्ये बरेच गुणधर्म असतात जे आपला मूड सुधारण्यास मदत करतात. यासोबतच डार्क चॉकलेट गरम आहे, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, तर चला जाणून घेऊया डार्क चॉकलेट कॉफी कशी बनवावी?

डार्क चॉकलेट कॉफी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 2 कप दूध
  • 2 तुकडे डार्क चॉकलेट
  • 1 टीस्पून कॉफी पावडर 1/2 टीस्पून वेलची पावडर
  • 4 टीस्पून साखर पावडर
  • 4-5 बर्फाचे तुकडे

डार्क चॉकलेट कॉफी कशी बनवावी?

  • डार्क चॉकलेट कॉफी बनवण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम एका पॅनमध्ये दूध घाला.
  • मग मध्यम आचेवर हलके गरम करून गॅस बंद करा.
  • यानंतर एका भांड्यात दूध टाकून त्यात कॉफी पावडर घालून चांगले मिक्स करावे.
  • त्यानंतर कमीत कमी पाच मिनिटे चमच्याच्या साहाय्याने दूध मिसळत राहावे.
  • यानंतर मिक्सर जारमध्ये दूध टाकून त्यात क्रश डार्क चॉकलेट घालावे.
  • नंतर त्यात वेलची पूड आणि साखर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात तीन-चार बर्फाचे तुकडे घालावेत.
  • आता तुमची डार्क चॉकलेट कॉफी तयार आहे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)