Detox Drink | शरीराला निरोगी राखण्यात मदत करतील ‘ही’ डीटॉक्स ड्रिंक्स, डाएटमध्ये नक्की सामील करा!

| Updated on: Jan 02, 2021 | 5:22 PM

बदलती जीवनशैली आणि अरबट-चरबट खाण्यामुळे शरीरात गंभीर आजार उद्भवू शकतात. म्हणून, डीटॉक्सिफिकेशनद्वारे असे हानिकारक घटक वेळोवेळी शरीराबाहेर टाकणे आवश्यक आहे

Detox Drink | शरीराला निरोगी राखण्यात मदत करतील ‘ही’ डीटॉक्स ड्रिंक्स, डाएटमध्ये नक्की सामील करा!
Follow us on

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी डीटॉक्सिफायनिंग करणे आवश्यक आहे. टॉक्सिक घटक आपल्या आरोग्यास हानिकारक असतात. जास्त प्रमाणात पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात, असे म्हटले जाते. बदलती जीवनशैली आणि अरबट-चरबट खाण्यामुळे शरीरात गंभीर आजार उद्भवू शकतात. म्हणून, डीटॉक्सिफिकेशनद्वारे असे हानिकारक घटक वेळोवेळी शरीराबाहेर टाकणे आवश्यक आहे (Detox drink recipe for good health).

शरीरास डीटॉक्सिफाय करण्यासाठी पाण्यासह औषधी वनस्पती, फळे आणि भाज्या यांच्या मदतीने एक पेय तयार केले जाते, याला ‘डीटॉक्स ड्रिंक’ देखील म्हटले जाते. हे डीटॉक्स ड्रिंक पिण्यामुळे आपल्या शरीराला झटपट ऊर्जा मिळेल.

काकडी, पुदिना आणि लिंबाच्या रसाने बनवलेले डीटॉक्स वॉटर

काकडी, पुदिना आणि लिंबू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. पाण्यात काकडी, लिंबू, पुदिना टाकून प्यायल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते. काकडी, पुदिना आणि लिंबूयुक्त पाणी 12 ते 16 तासांपर्यंत ठेवता येते. परंतु, हे घटक जास्त काळ भिजत राहिल्यास पाण्याची चव कडू होऊ शकते. काकडी, पुदिना आणि लिंबूयुक्त डीटॉक्स ड्रिंक पिण्यामुळे आपल्याला ताजेतवाने वाटेल आणि त्वरित ऊर्जा देखील मिळेल (Detox drink recipe for good health).

हळद आणि पालकपासून बनवलेले डीटॉक्स ड्रिंक

हळद आणि पालक आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. हळदीत बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. तर पालक एक डिटोक्सिफाइंग घटक आहे, जो तुमचे पाचन तंत्र पूर्णपणे स्वच्छ करण्याचे कार्य करतो. हळद आणि पालक वाटून त्याची स्मुदी तयार करता येते. ही स्मुदी आपण दिवसभरात एक ते दोन कप पिऊ शकता. तसेच, दररोज पालकाचे सेवन करा. यासाठी आपण पालकाचे सूप बनवू शकता किंवा पालक इतर भाज्यांमध्ये मिसळून खाऊ शकता. पालक आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतो. हळदीमध्ये ‘व्हिटामिन ए’ मुबलक प्रमाणात असते, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

आंबा आणि तुळशीच्या पानांचे डीटॉक्स ड्रिंक

तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स घटक असतात, जे पेशींचा कर्करोगापासून बचाव करण्यात मदत करतात. तर, आंबा आपली पचन शक्ती वाढण्याव्यतिरिक्त, रक्तदाब देखील नियंत्रित ठेवतो. याचबरोबर तो शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करतो. यासाठी आपण आंब्याच्या रसात तुळशीची पाने टाकून, हे पेय पिऊ शकता.

(Detox drink recipe for good health)

हेही वाचा :