लहानग्यांमध्ये तिरंगा, तर मोठ्यांमध्ये पेंडन्ट राख्यांची क्रेझ

रक्षाबंधन नुकतं काहीच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. येत्या 15 ऑगस्टला नारळी पौर्णिमेचा मुहूर्त आहे. त्यामुळे सध्या बाजारात वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्यांनी दुकानं सजली आहेत. यावर्षी अनेक नवे ट्रेंड राख्यांमध्ये पाहायला मिळत आहेत.

लहानग्यांमध्ये तिरंगा, तर मोठ्यांमध्ये पेंडन्ट राख्यांची क्रेझ

मुंबई : भाऊ-बहिणीच्या नात्याचं, त्यांच्यातल्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे रक्षाबंधनचा सण. वर्षभर सर्वच भाऊ-बहीण या सणाची आतुरतेने वाट पाहात असतात. हिंदू संस्कृतीनुसार, श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करते, त्यासोबतच बहिणीच्या रक्षणाचे वचन यावेळी भाऊ देतो. पूर्वी राखी साजरी करताना जर बहिणीने रेशमीधागाही मनगटावर बांधला, तरी भावाला आनंद व्हायचा. मात्र, यंदाचा काळच वेगळा आहे. आता तर भावांना वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्या हव्या असतात. त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनला बाजारात नवीन ट्रेंड असतो. त्या वर्षी घडलेल्या घटना किंवा एखादा प्रसिद्ध झालेला सिनेमा यावर या राख्यांचे ट्रेंड ठरत असतात. तसाच ट्रेंड यंदाही आहेच.

रक्षाबंधन नुकतं काहीच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. येत्या 15 ऑगस्टला नारळी पौर्णिमेचा मुहूर्त आहे. त्यामुळे सध्या बाजारात वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्यांनी दुकानं सजली आहेत. रंगीबेरंगी राख्यांमुळे बाजार फुलला आहे. यावर्षी अनेक नवे ट्रेंड राख्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी फॅन्सी राख्यांनी ट्रेडिशनल राख्यांची जागा घेतली आहे. एकीकडे लहान मुलांमध्ये तिरंगा राखीचं क्रेझ आहे, तर मोठ्यांची पसंती ही चूडी राखी आणि इको फ्रेंडली ब्रेसलेट राख्यांना आहे. त्यामुळे सध्या रक्षाबंधनच्या या पारंपरिक सणाला आता स्टायलिश टच मिळाला आहे.

लहान मुलांमध्ये तिरंगा राखीचं क्रेझ

मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही रक्षाबंधन सणाची उत्सुकता असते. यावेळी लहान मुलांमध्ये तिरंगा राखीचं क्रेज पाहायला मिळत आहे. 15 ऑगस्टला रक्षाबंधसोबतच स्वातंत्र्य दिन असल्याने सध्या बाजारात तिरंगा राख्या ट्रेंडमध्ये आहेत. तिरंग्याच्या आकाराची ही राखी अत्यंत सुंदर आहे. कार्टून राख्यांनंतर या तिरंगा राख्यांना लहान मुलांची पसंती आहे.

चूडी राखी

यंदा बाजारात चूडी राखीची खूप डिमांड आहे. राखीचं हे डिझाईन अगदी नवं आणि वेगळं आहे. ही राखी रंगीबेरंगी असल्याने त्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. चूडी राखी ही एखाद्या बांगडी किंवा कड्या प्रमाणे असते. त्या दिसायला तर सुंदर असतातच, सोबतच त्या घालायलाही कम्फर्टेबल असतात. तसेच, ही राखी लवकर खराबही होत नाही, त्यामुळे ती अधिक काळ मनगटावर टिकून राहाते.

मोती, जरी आणि जरदोजी राख्या

यावेळी रक्षाबंधनला पांढरे मोती, फॅन्सी जरी आणि जरदोजी राख्यांचीही खूप डिमांड आहे. या राख्या दिसायला अत्यंत साध्या आणि सुंदर असतात. या राख्याही यंदा ट्रेंडमध्ये आहेत. भावासोबतच वहीणीसाहेबांना बांधणाऱ्या राख्यांमध्येही यावेळी वेगळा ट्रेंड आहे. या राख्यांमध्ये वेगवेगळी व्हेरायटीही पाहायला मिळत आहे. घुंघरू, लाख, राजस्थानी मिरर वर्क आणि काचेची सजावट असलेल्या राख्या सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये कलर्ड स्टोन, कुंदन वर्क, कलर्ड बीड्सचाही वापर करण्यात आला आहे.

पेंडन्ट राख्या

इतर ट्रंडसोबतच यंदा काही विशेष राख्या बाजारात पाहायला मिळत आहेत. या राख्यांवर संदेश किंवा नावं, भाऊ असं सगळं लिहिलेलं असते. या राख्याही सध्या ट्रेंडनमध्ये आहेत. यामध्ये छोटा भाई’, ‘ब्रो’, ‘बडे मिया’, ‘विरे’, ‘स्वॅग भाई’ अशा हटके नावांच्या डिझाईनर पेंडन्ट राख्याही ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *