AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीपूर्वी करा 7 दिवसांचा योगा चॅलेंज! घरबसल्या मिळवा फिट बॉडी, रोज कोणती योगासने करायची?

7 Days Yoga Challenge: सणासुदीच्या धावपळीत अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मात्र, रोजच्या दिनचर्येत योगासनांसाठी थोडा वेळ काढल्यास शरीर सक्रिय ठेवण्यास आणि मानसिक ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. दिवाळीपूर्वी फिट राहण्यासाठी सुरू करा ७ दिवसांचा योगा चॅलेंज. जाणून घ्या रोज कोणती योगासनं करावी

दिवाळीपूर्वी करा 7 दिवसांचा योगा चॅलेंज! घरबसल्या मिळवा फिट बॉडी, रोज कोणती योगासने करायची?
YogaImage Credit source: tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Oct 22, 2026 | 2:51 PM
Share

नवरात्री, दसरा झाला आणि आता दिवाळीचे वेध लागले. सणांचा काळ म्हटला की घरातील कामांची लगबग, खरेदीची धावपळ, पाहुण्यांची ये-जा आणि विविध खाद्यपदार्थांची रेलचेल सुरू होते. दिवाळीच्या दिवसांत गोड पदार्थ, फराळ आणि तेलकट पदार्थ खाण्याचे प्रमाणही वाढते. अशा वेळी बदललेली दिनचर्या, अपुरी झोप आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे दिवाळीच्या तयारी सोबतच आपल्या फिटनेसकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची किंवा हेवी वर्कआउट करण्याची गरज नाही. घरच्या घरी दररोज काही मिनिटे योगाभ्यासासाठी काढून तुम्ही निरोगी जीवनशैलीची सुरुवात करू शकता.

योगासनांमुळे शरीर सक्रिय ठेवण्यास, लवचिकता वाढवण्यास आणि मानसिक शांतता मिळवण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे, योगाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला आधीपासून व्यायामाची सवय असण्याची आवश्यकता नाही. सोपी योगासने, हलके स्ट्रेचिंग आणि श्वासोच्छ्वासाचे व्यायाम यांपासून सुरुवात करता येते. दिवाळीपूर्वी सात दिवसांचा योगा चॅलेंज स्वीकारून तुम्ही नियमित व्यायामाची सवय लावण्याचा प्रयत्न करू शकता. या सात दिवसांत दररोज कोणते योगासन करायचे, हे जाणून घेऊया.

पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत योगाभ्यासाचा हा सोपा दिनक्रम पाळा.

– पहिला दिवस – पाच मिनिटे दीर्घ श्वास घेण्यापासून आणि हलक्या स्ट्रेचिंगपासून सुरुवात करा.

– दुसरा दिवस – ताडासन आणि वृक्षासन यांसारख्या सोप्या योगासनांचा सराव करा.

– तिसरा दिवस – मार्जरी आसन म्हणजेच कॅट-काऊ स्ट्रेच करून शरीराला आराम द्या.

– चौथा दिवस – आपल्या क्षमतेनुसार हलक्या पद्धतीने सूर्य नमस्काराचा सराव करा.

– पाचवा दिवस – बालासन आणि सुखासनाच्या मदतीने शरीराला विश्रांती देण्यावर लक्ष केंद्रित करा.

– सहावा दिवस – हलके स्ट्रेचिंग करा आणि त्यासोबत अनुलोम-विलोम प्राणायामाचा सराव करा.

– सातवा दिवस – तुम्हाला सोपी वाटणारी आणि आवडणारी योगासने पुन्हा करा. तसेच, नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प करा.

फिट राहण्यासाठी केवळ योगासन करणे पुरेसे नाही. योगाभ्यासासोबत पुरेशी झोप घेणे, संतुलित आहार घेणे आणि दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. सुरुवात आपल्या शारीरिक क्षमतेनुसार करा. कोणतेही आसन करताना वेदना किंवा अस्वस्थता जाणवल्यास सराव थांबवा.

Follow Us
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?