डायबिटीसच्या रुग्णांनी मटण खाणे कितपत योग्य? अन् आठवड्यातून किती वेळा खावे?

अनेकांना मांसाहारमध्ये चिकनपेक्षाही मटण खाणे पसंत असते. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा मटण खाणे होते. पण तुम्हाला माहितीये का की, वारंवार मटण खाल्ल्यानेही अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच वारंवार मटण खाल्ल्याने डायबिटीसचा धोका वाढतो असंही म्हटलं जातं. याबद्दल जाणून घेऊयात.

डायबिटीसच्या रुग्णांनी मटण खाणे कितपत योग्य? अन् आठवड्यातून किती वेळा खावे?
Does eating mutton frequently increase the risk of diabetes
Image Credit source: Meta AI
| Updated on: Jun 21, 2025 | 2:16 PM

अनेक घरांमध्ये, मांसाहारसाठी आठवड्याचे काही दिवस हे ठरलेले असतात. तसेच, अनेक लोक घरी कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीत मांसाहार खाणे पसंत करतात. बहुतेक लोकांना मांसाहारी पदार्थांमध्ये मच्छी आणि मटण फार आवडते. मात्र काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते वारंवार मटण खाणे किंवा जास्त प्रमाणात मटण खाणे हे धोक्याचं लक्षण ठरू शकतं. कारण अलिकडच्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की जे लोक जास्त मटण खातात त्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. जाणून घेऊयात नक्की काय सत्य आहे ते.

वारंवार मटण खातात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.

मटण खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रथिने आणि इतर पोषक तत्वे मिळतात. परिणामी, अनेक आरोग्य फायदे मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का की मटण अनेक समस्याही निर्माण करू शकतं, जसं की केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की जे लोक वारंवार मटण खातात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.

आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा मटण खाणे कितपत योग्य?

या संशोधनाअंतर्गत, केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दहा वर्षांपासून मटण खाण्याची सवय असलेल्या लोकांचे आरोग्य लक्षात घेतले गेले. या संशोधनातून असे दिसून आले आहे की जे लोक आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा मटण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात (करी, सूप किंवा तळलेले) खातात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. प्रामुख्याने शास्त्रज्ञांना असे आढळून आले की मटणातील हानिकारक संतृप्त चरबी नैसर्गिक इन्सुलिनला प्रतिबंध करते.

फक्त दोनदा लाल मांस खाल्लं तरी टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो का?

एवढंच नाही तर, संशोधनानुसार, आठवड्यातून फक्त दोनदा लाल मांस खाल्लं तरी टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. तसेच जास्त प्रमाणात लाल मांस खाणाऱ्यांना मधुमेहाचा धोका इतरांपेक्षा 62% अधिक असतो.

याशिवाय, संशोधनातून असा निष्कर्षही निघाला आहे की घरी मटण शिजवणाऱ्यांच्या तुलनेत, विविध कंपन्यांचे प्रक्रिया केलेले आणि पॅकेज केलेले मटण खाणाऱ्यांना मधुमेहाचा धोका जास्त आहे. आरोग्य तज्ज्ञ चांगल्या फॅट्स आणि प्रथिनांसाठी मटणाऐवजी मासे खाण्याचा सल्ला देतात. वारंवार मटण खातात त्यांनी काळजी घ्यावी.

आठवड्यातून किती वेळा मटण खावे?

मटण किंवा कोणताही मांसाहार पूर्णपणे बंद करणे आवश्यक नाही, पण आठवड्यातून एकदा आणि मर्यादित प्रमाणात मांसाहार खाणे सुरक्षित ठरू शकतं.