AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात का? आंब्याच्या कोयीपासून बनवा हा सोपा नैसर्गिक हेअर मास्क

आजकाल अनेक लोकं केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आंब्याच्या कोयीपासून बनवलेला हेअर मास्क वापरता येतो. यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होऊ शकते. चला तर मग आंब्याच्या कोयीपासून घरच्या घरी सोप्या पद्धतीने हेअरमास्क कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात का? आंब्याच्या कोयीपासून बनवा हा सोपा नैसर्गिक हेअर मास्क
hair mask
| Edited By: | Updated on: Jul 16, 2026 | 12:31 PM
Share

आजकाल बहुतेक लोकं केस पांढरे होण्याच्या समस्येमुळे खूप चिंतेत आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण बाजारात मिळणारे डाय, हेअर मास्क आणि मेंदी वापरू केस काळे करतात.मात्र कालांतराने या उत्पादनांमधील केमिकल केसांचे आरोग्यावर परिणाम करतात त्यानंतर केसांच्या समस्या आणखी वाढतात. अशा परिस्थितीत पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय सर्वात उपयुक्त मानले जातात. त्यात आजकाल बहुतेकजण हे घरगुती उपाय करण्याकडे जास्त भर देत आहेत. तर आज आपण एका अशा हेअर मास्कबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमचे पांढरे केस काळे करण्यास मदत करू शकतो.

आंब्याच्या कोयीपासून तयार करा नैसर्गिक हेअरमास्क

आपण प्रत्येकजण रसाळ असलेला आंबा खाल्ला की त्याची कोय फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का की ह्या टाकून दिलेल्या कोय तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. हो आंब्याच्या कोयची पावडर वापरल्याने तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया की हा हेअर मास्क तुम्ही घरी सहजपणे कसा बनवू शकता.

आंब्याच्या कोयीपासून केसांचा मास्क कसा बनवायचा?

आंबा खाल्ल्यानंतर त्याची कोय फेकून न देता व्यवस्थित सुकवून घ्या.

केसांचा मास्क बनवण्यासाठी प्रथम सुकवलेली कोयची मिक्सरमध्ये बारीक पूड बनवा.

आंब्याच्या कोयीची पावडर तयार केल्यानंतर 10 ते 15 लवंगा आणि 2 चमचे कलौंजी घेऊन मंद आचेवर हलके भाजून घ्या.

आता भाजून झाल्यावर या दोन्ही गोष्टींची बारीक पूड तयार करा.

यानंतर एका लोखंडी कढईमध्ये कलौंजी आणि लवंग पूड टाका.

नंतर पॅनमध्ये 2 चमचे तयार केलेली आंब्याच्या कोयीची पावडर टाका.

आता या संपूर्ण मिश्रणात चमचे दही आणि मेहेंदी पावडर टाका.

आता कढईतील सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.

ही तयार पेस्ट एका लोखंडी कढईत रात्रभर तसेच ठेवा आणि तुमचा नैसर्गिक हेअर मास्क तयार होईल.

तयार हेअर मास्कचा वापर अशाप्रकारे करा

हा तयार केलेला मास्क केसांना लावा आणि दीड ते दोन तास तसाच राहू द्या. त्यानंतर, स्वच्छ पाण्याने केस धुवून टाका. तुम्ही दुसऱ्या दिवशी शॅम्पू लावू शकता. या हेअर मास्कमध्ये अनेक नैसर्गिक घटक आहेत जे तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यास मदत करतील. तुम्ही हा मास्क दर 15 दिवसांनी देखील वापरू शकता.

Follow Us
श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले'-सदाभाऊ खोत
Sadabhau Khot : 'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले', मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांचाच -सुप्रिया सुळे
Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
पैठणीसाठी आता बारकोड, वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती
Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु