
आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या अनेक गोष्टी औषधी गुणधर्मांचा खजिना असतात. अगदी काही आजारांपासून ते स्किन केअरपर्यंत सर्वचबाबतीत किचनमधील काही गोष्टींचा वापर करू शकतो. त्याचपद्धतीने पोटाच्या समस्येच्याबाबत देखील आपण घरगुती उपायांनी नक्कीच आराम मिळवू शकतो. अनेकदा आपण असंही ऐकलं असेल की जेवणाच्या अर्धातास आधी पाणी प्या किंवा जेवण झाल्यावर अर्धातासानंतर पाणी प्या. त्यामागे केलेल्या जेवणाचे नीट पचन व्हावं हाच उद्देश असतो.
जेवणाआधी 15 मिनीटे आले, लिंबू आणि सैंधव मीठ खावं
त्याचप्रमाणे जेवणाआधी 15 मिनीटे आधी आले, लिंबू आणि सैंधव मीठ खावं असं म्हटलं जातं.दिसायला हा फार सामान्य उपाय दिसत असला तरी त्याचे फायदे मात्र भरपूर आहेत. विशेषतः, पचन सुधारण्यासाठी हे रामबाण औषधापेक्षा कमी नाहीत. जेवणाच्या 15 मिनिटे आधी आले, लिंबाचा रस आणि सैंधव मीठ खाल्ल्याने काय होते हे तुम्हाला माहिती आहे का? पचन सुधारण्यासाठी असो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी असो किंवा बीपी आणि साखरेसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असो, आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या गोष्टी खूप उपयुक्त ठरू शकतात.
त्यापैकी एक आले, लिंबू आणि सैंधव मीठ खाणे. या तिन्ही गोष्टी गुणधर्मांचा खजिना आहेत आणि त्या एकत्र घेतल्यास त्या आरोग्य टॉनिकसारखे काम करतात. विशेषतः, पचन सुधारण्यासाठी ते रामबाण औषधापेक्षा कमी नाही.
खाण्याची पद्धत
1 इंचाचा आल्याचा तुकडा किसून घ्यायचा आहे. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर सैंधव मीठ घालून जेवणाच्या 15 मिनिटे आधी याचे सेवन करा. सुरुवातीला अगदी लहान प्रमाणापासून सुरुवात केली तरी चालेल.
जेवणाच्या 15 मिनिटे आधी आले, लिंबाचा रस आणि सैंधव मीठ खाल्ल्याने कोणते फायदे मिळता ते जाणून घेऊयात.
> जेवणाच्या 15 मिनिटे आधी आले, लिंबाचा रस आणि खडे मीठ खाल्ल्यास काय होते?
> जेवणाच्या 15 मिनिटे आधी आले, लिंबाचा रस आणि सैंधव मीठ घेतल्याने भूक वाढते आणि पाचक एंजाइम सक्रिय होतात, ज्यामुळे पचन सुधारते.
> आल्यामध्ये असलेले जिंजरॉल आणि लिंबामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड पचन सुधारते. सैंधव मीठ पाचक रसांना देखील उत्तेजित करते, जे अन्नाचे योग्य पचन करण्यास मदत करते.
> जेवणाच्या 15 मिनिटे आधी आले, लिंबाचा रस आणि सैंधव मीठ घेतल्यास पोटात आम्लता आणि पोटफुगी टाळता येते आणि पोटात गॅसही तयार होत नाही.
> जेवणाच्या 15 मिनिटे आधी हे मिश्रण सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते, फॅटी लिव्हरची समस्या कमी होते आणि लिव्हर निरोगी होते.
> जेवल्यानंतर पोटात जडपणा जाणवणाऱ्यांसाठी ही रेसिपी एक रामबाण उपाय आहे.
> जेवणाच्या 15 मिनिटे आधी ते घेतल्याने चयापचय सुधारतो , चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते, जास्त खाण्यापासून रोखले जाते आणि वजन कमी होते.
यामुळे शरीराला अन्नातील पोषक तत्वे योग्यरित्या शोषण्यास मदत होते. दररोज याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.