Cardamom Benefits | ‘वेलची’चे नियमित सेवन करा आणि ‘या’ आजारांना दूर पळवा!

| Updated on: Jan 29, 2021 | 1:55 PM

मुखशुद्धीसाठी विड्यातून तसेच विविध पदार्थांतून वापरात असलेली वेलची शरीराचे स्वाथ्य वाढवण्यासाठी गुणकारी ठरते.

Cardamom Benefits | वेलचीचे नियमित सेवन करा आणि या आजारांना दूर पळवा!
वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे.
Follow us on

मुंबई : वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं (Health benefits of Cardamom aka ilaichi).

भारतीय स्वयंपाकघरात वेलचीचा वापर तिखटाच्या आणि गोडाच्या पदार्थांत देखील प्रामुख्याने होतो. पदार्थ स्वादिष्ट बनवण्याबरोबरीबनेच वेलचीत अनेक औषधी गुणधर्मदेखील दडले आहेत. मुखशुद्धीसाठी विड्यातून तसेच विविध पदार्थांतून वापरात असलेली वेलची शरीराचे स्वाथ्य वाढवण्यासाठी गुणकारी ठरते.

हे आहेत वेलचीचे फायदे :

हृदयविकारचा धोका कमी होईल.

आजकाल सर्वाधिक लोकांना हृदयविकाराची समस्या होत आहेत. याचाच अर्थ असा की बर्‍याचदा लोकांच्या हृदयाचा ठोका कमी होतो. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का, की वेलची आपल्या हृदयाचा ठोका व्यवस्थित ठेवण्यात महत्वाची भूमिका निभावते? वास्तविक, वेलचीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात. पोटॅशियम हा आपल्या रक्तातील, शरीरातील द्रव आणि ऊतींचा मुख्य घटक असतो. वेलचीच्या सेवनाने शरीरात पुरेसे पोटॅशियम टिकून राहते.

फुफ्फुसांच्या समस्या कमी होतील.

वेलचीमुळे आपल्या फुफ्फुसात जलद रक्त संचार होतो. यामुळे दमा, तीव्र सर्दी आणि खोकला यासारख्या श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून आराम मिळतो. आयुर्वेदात वेलची उष्ण पदार्थ मानली जाते, जी शरीराला उबदारपणा देते.

ब्लड प्रेशर नियंत्रित करते.

वेलची कमी प्रमाणात सेवन केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपल्या शरीरातील बहुतेक रोग उच्च रक्तदाबमुळे उद्भवतात. जर आपण दररोज कमीतकमी 3 वेलची खाल्ली, तर आपला संपूर्ण रक्तदाब नियंत्रणात राहील (Health benefits of Cardamom aka ilaichi).

तोंडाचा दुर्गंध दूर करते.

वेलची खाल्ल्याने तुमच्या तोंडाचा दुर्गंध देखील दूर होतो. वेलची एक प्रकारे माऊथ फ्रेशनर प्रमाणे कार्य करते. जर आपल्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर आपण नेहमीच तोंडात एखादी वेलची ठेवू शकता.

बद्धकोष्ठतेपासून आराम देते.

जर आपल्याला पोटात बद्धकोष्ठतेची समस्या येत असेल, तर ती बर्‍याच गंभीर आजारांना देखील जन्म देते. म्हणून ही समस्या टाळण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करावेत. मात्र, आपल्यालाही अशी समस्या असल्यास, छोटी वेलची पाण्यात उकळवून ते पाणी प्यायल्यास तुम्हाला खूप फायदा होईल. तसेच हे आपल्या पाचन तंत्रास बळकट देखील करेल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(Health benefits of Cardamom aka ilaichi)

हेही वाचा :