AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरगुती जेवण की डाएट फूड… वजन कमी करण्यासाठी काय आहे अधिक चांगलं?

आजकाल वाढते वजन ही बहुतेक लोकांसाठी एक समस्या बनली आहे. वाढते वजन कमी करण्यासाठी लोकं व्यायाम करतात आणि आहारावर लक्ष केंद्रित करतात. काही लोकं वजन कमी करण्यासाठी डाएट फूड घेतात तर काही घरी बनवलेले अन्न सेवन करतात.

घरगुती जेवण की डाएट फूड... वजन कमी करण्यासाठी काय आहे अधिक चांगलं?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 09, 2025 | 6:58 PM
Share

चुकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याचे प्रमाण वाढत चालेले आहे. अशातच ही समस्या एक सामान्य समस्या बनली आहे. वाढत्या वजनामुळे अनेक आजारही होतात. त्यामूळे वजन कमी करणे खूप महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी घरातील अन्नाचे सेवन सर्वात उत्तम ठरेल. पण यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे आणि किती अन्न खात आहात हे वजन कमी करण्यासाठी जास्त महत्वाचे असते. कारण आजकाल सोशल मीडिया, यूट्यूब आणि फिटनेस ब्लॉग वेगवेगळ्या डाएट प्लॅन, डिटॉक्स ड्रिंक्स, मील रिप्लेसमेंट शेक आणि फॅट बर्निंग फूडने भरलेले आहेत.

या सगळ्यामध्ये अनेकांना प्रश्न पडतो की साधे, सिपंल घरी शिजवलेले अन्न वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे की नाही. त्याच वेळी काही लोकं महागडे डाएट फूड आणि रेडी-टू-ईट हेल्दी स्नॅक्स वजन कमी करण्याचा शॉर्टकट मानतात. जर तुम्हीही या संभ्रमात असाल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वजन कमी करण्यासाठी घरी शिजवलेले अन्न चांगले आहे की डाएट फूड.

घरगुती जेवणात काय खास आहे?

घरी शिजवलेले अन्न संतुलित आणि पोषक तत्वांनी समृद्ध असते. ज्यामध्ये डाळी, भाज्या, चपाती, भात, सॅलड, दही इत्यादींचा समावेश असतो. घरी बनवलेल्या अन्नात प्रथिने, फायबर, कार्ब्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासारखे पोषक घटक असतात. जे एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

घरगुती जेवणाचे फायदे

घरी शिजवलेल्या अन्नाचा फायदा म्हणजे ते ताजे असते. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार आणि आरोग्यानुसार घरी कमी तेल, कमी मीठ वापरून आणि कोणत्याही प्रक्रियेशिवाय बनवू शकता. त्याच वेळी घरगुती अन्नात कोणतेही प्रिजर्वेटिव्ह नसतात. याशिवाय, ते पोट बराच काळ भरलेले ठेवतात, ज्यामुळे जास्त खाणे टाळण्यास मदत होते.

डाएट फूड म्हणजे काय?

डाएट फूड म्हणजे जे वजन कमी करण्यासाठी किंवा तंदुरुस्त राहण्यासाठी विशेषतः तयार केलेले पदार्थ. यामध्ये बहुतेकदा मील रिप्लेसमेंट शेक किंवा बार, ओट्स, ग्रॅनोला, मुएसली, लो-कार्ब स्नॅक्स, फॅट-फ्री किंवा शुगर-फ्री प्रॉडक्ट, रेडी-टू-ईट हेल्दी जेवण यांचा समावेश असतो. हे पदार्थ “हेल्दी” म्हणून विकले जातात, परंतु त्यामध्ये अनेकदा लपलेले प्रिजर्वेटिव्ह, आर्टिफिशिअल स्विटनर आणि थोडेसे पोषण असू शकते.

डाएट फूडचे फायदे

डाएट फूडमध्ये कॅलरीज नियंत्रित करणे सोपे आहे. कारण हे डाएट फूड लवकर तयार करता येतात, ज्यामुळे वेळही वाचतो. तुम्ही प्रवास करताना किंवा ऑफिसच्या वेळेत याचे सेवन सहजपणे करू शकता.

वजन कमी करण्यासाठी कोण सर्वोत्तम आहे?

घरगुती अन्न आणि डाएट फूड दोघांचेही स्वतःचे महत्त्व आहे, परंतु जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो तेव्हा घरगुती पदार्थ हा एक चांगला आणि अधिक प्रभावी पर्याय मानला जातो. घरी शिजवलेल्या अन्नात पोषणाचे संतुलन असते. जसे की डाळी, भाज्या, चपाती भात आणि सॅलड, जे शरीराला आवश्यक प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे प्रदान करतात. तसेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि आरोग्यानुसार ते बनवू शकता.

दुसरीकडे, डाएट फूड, कमी कार्बयुक्त स्नॅक्स किंवा तयार आरोग्यदायी पदार्थ यासारखे आहारातील पदार्थ सहसा महाग असतात आणि त्यात लपलेले कृत्रिम घटक तूमच्या शरीरासाठी काही काळानंतर हानिकारक ठरू शकतात. डाएट फूडमुळे लवकर वजन कमी होते, पण घरी बनवलेले अन्न तुम्हाला दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर.....
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...