AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Fall: केस गळतीमुळे त्रस्त आहात? घरात सहज मिळणाऱ्या गोष्टींपासून बनवा हा हेअर पॅक!

केस गळण्याचं प्रमाण वाढल्यास केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. अशा वेळी घरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून तयार केलेला हेअर पॅक केसांची निगा राखण्यासाठी कसा उपयोगी ठरू शकतो, जाणून घेऊया.

Hair Fall: केस गळतीमुळे त्रस्त आहात? घरात सहज मिळणाऱ्या गोष्टींपासून बनवा हा हेअर पॅक!
how to stop hair fall
| Edited By: | Updated on: Oct 23, 2026 | 5:56 PM
Share

त्वचेप्रमाणेच केसांची नियमित काळजी घेणं सुध्दा तितकंच महत्त्वाचं आहे. केसांची योग्य निगा न राखल्यास केस कोरडे होणे, तुटणे आणि केस गळतीसारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेकदा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात केस पडलेले दिसतात, तर केस विंचरताना सुद्धा मोठ्या प्रमाणात केस गळतात. अशावेळी अनेक जण हेअर फॉल कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअर प्रोडक्ट्सचा वापर करतात. मात्र, केसांची निगा राखण्यासाठी घरात सहज उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करता येतो. तांदळाचं पाणी, मध, खोबरेल तेल आणि ॲलोवेरा जेल यांपासून घरच्या घरी हेअर मास्क तयार करता येतो. हा मास्क कसा बनवायचा, तो केसांना कसा लावायचा, जाणून घेऊया. हा घरगुती हेअर मास्क वापरून पाहा

केस गळण्याचं प्रमाण वाढलं असेल, तर केसांची आणि टाळूची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. केस गळताना दिसल्यास अनेक जण बाजारातील विविध हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात. मात्र, घरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचाही केसांच्या निगेसाठी उपयोग करता येतो. तांदळाचं पाणी, मध, खोबरेल तेल आणि ॲलोवेरा जेल या चार पदार्थांपासून घरच्या घरी हेअर मास्क तयार करता येतो.

कसा तयार करायचा हेअर मास्क?

हा घरगुती हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात तांदळाचं पाणी घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार मध, खोबरेल तेल आणि ॲलोवेरा जेल घाला. आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्या. मिश्रण एकसारखं होण्यासाठी ते चांगलं फेटून घ्या. सर्व पदार्थ एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळल्यानंतर गुळगुळीत मिश्रण तयार होईल. अशा प्रकारे तुमचा घरगुती हेअर मास्क तयार होईल.

केसांना कसा लावायचा हेअर मास्क?

हा हेअर मास्क लावण्यासाठी सर्वप्रथम केसांचे छोटे-छोटे भाग करा. त्यानंतर कॉटन बॉल घेऊन त्याच्या मदतीने मास्क केसांच्या मुळांजवळ आणि टाळूवर लावायला सुरुवात करा. संपूर्ण टाळूवर मिश्रण व्यवस्थित लावून घ्या, जेणेकरून ते सर्व भागांमध्ये पोहोचेल. त्यानंतर बोटांच्या मदतीने टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. हा मास्क केसांवर साधारण ३० मिनिटे राहू द्या. अर्ध्या तासानंतर माइल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…