Kitchen Tips : चाकूची धार गेली? नवा चाकू आणण्याआधी हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

रोजच्या वापरामुळे किचनमधील चाकूची धार कमी होणे सामान्य आहे. नवा चाकू घेण्याआधी घरच्या घरी धार तपासण्यापासून ते शार्प करण्यापर्यंतच्या सोप्या पद्धती जाणून घ्या. चाकूला धार लावताना जास्त जोर देणे किंवा वारंवार कोन बदलणे टाळा. घरच्या घरी चाकू धारदार करण्याच्या सोप्या पद्धती आणि कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घ्या.

Kitchen Tips : चाकूची धार गेली? नवा चाकू आणण्याआधी हे घरगुती उपाय नक्की करून पाहा
fruits cutting knife
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 7:31 PM

किचनमध्ये रोज भाजी, फळं किंवा इतर पदार्थ कापण्यासाठी वापरला जाणारा चाकू काही काळाने बोथट होतो, म्हणजेच त्याची धार निघून जाते. त्यामुळे मऊ फळ किंवा भाज्या कापताना नाकी नऊ येतात, मग आपल्याला
बाजारातून नवा चाकू आणा रे अश्या आईच्या किचनमधून मागण्या ऐकू येतात. पण प्रत्येक वेळी नवा चाकू आणायची लीगरज नाही. काही सोप्या टिप्समुळे तुम्ही घरच्या घरी चाकूला छान धार लावू शकता.

चाकूची धार कमी झाली आहे हे कसं ओळखायचं

चाकूची धार तपासण्यासाठी कागदाचा वापर करता येतो. कागद सरळ करून तो चाकूने कापून पाहा.चाकू सहज कागद कापत असेल तर चाकूची धार व्यवस्थित आहे. मात्र कागद फाटत असेल किंवा चाकू मधेच अडकत असेल तर धार कमी झालेली असू शकते. याशिवाय तुम्ही पिकलेल्या टोमॅटोवरही चाकू फिरवून पाहू शकता. टोमॅटोवर जास्त दाब न देता टोमॅटो सहज कापला जात असेल तर धार चांगली आहे. पण जास्त दाब घ्यावा लागला तर धार गेली आहे असे समजून जा.

Loading...

शार्पनिंग स्टिलचा वापर

चाकूची धार थोडी गेली असेल तर शार्पिनिंग स्टील उपयोगी ठरू शकते. यामुळे चाकूचे नुकसान न होता चाकूची धार व्यवस्थित होईल. चाकू साधारण २० अंशाच्या कोनात ठेवून ब्लेड हळूहळू स्टिलवरून चालवा.यामुळे चाकू छान धारदार होईल.

व्हेटस्टोनने चाकूला धार द्या

चाकू खूपच बोथट झाला असेल किंवा धार कायमची गेली असेल तर व्हेटस्टोन म्हणजेच शार्पनिंग स्टोनचा वापर करता येतो. चाकू साधारण 20 ते 30 अंशाच्या कोनात ठेवून ब्लेड हळूहळू स्टोनवरून फिरवा. दुसऱ्या बाजूने देखील हिच पद्धत वापरा .

सिरेमिक कपचा वापर

घरात शार्पनिंग टूल नसेल तर सिरेमिक कपचा वापर करून धार करू शकता. कप उलटा ठेवा आणि त्याच्या तळाशी असलेल्या खडबडीत भागावर चाकूची धार सावधपणे फिरवा.

मॅन्युअल शार्पनर ठरेल सोपा पर्याय

चाकू पटकन धारदार करायचा असेल तर
मॅन्युअल शार्पनर वापरता येतो. शार्पनरमधील स्लॉटमध्ये चाकूचे ब्लेड ठेवून हलक्या हाताने मागच्या दिशेने ओढा. रोजच्या वापरातील चाकूला धार करण्यासाठी हा सोपा पर्याय मानला जातो.

 

सँडपेपरचा वापर

गरज पडल्यास सँडपेपरचा वापरही करता येतो.मीडियम ते फाइन ग्रिटचा सँडपेपर सपाट लाकडी ब्लॉकवर ठेवा. त्यावर चाकू साधारण 20 अंशाच्या कोनात ठेवूम दोन्ही बाजूंनी हळूहळू फिरवा.

चाकूला धार लावताना या चुका टाळा

चाकू धारदार करताना खूप जोर लावू नका. जास्त दाबामुळे धार असमान होते. त्यामुळे हात घसरण्याता धोका वाढतो. चाकूचा कोन शक्यतो सारखाच ठेवा. चुकूनही कोन बदलल्यास चाकूला व्यवस्थित धार येणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us