Beauty Tips : फाटलेल्या टाचांमुळे पाय खराब दिसतात? वेदना होतात, या सोप्या 5 घरगुती टिप्स गायब करतील भेगा आणि करतील पाय मऊ

हवामानातील कोरडेपणा, जास्त गरम पाण्याचा वापर आणि त्वचेतील ओलावा कमी झाल्यामुळे टाचांची त्वचा कोरडी पडून भेगा पडू शकतात. नियमित मॉइश्चरायझिंगमुळे हा कोरडेपणा कमी करण्यास मदत होऊ शकते.

Beauty Tips : फाटलेल्या टाचांमुळे पाय खराब दिसतात? वेदना होतात, या सोप्या 5 घरगुती टिप्स गायब करतील भेगा आणि करतील पाय मऊ
पायांच्या भेगा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 9:18 PM

फाटलेल्या टाचांमुळे पायांचा लुक खराब तर दिसतोच, पण जास्त भेगा पडल्या तर वेदना, जळजळ आणि कधी कधी रक्तस्त्रावही होतो. बदलत्या हवामानात पायांची त्वचा कोरडी पडल्यामुळे टाचांना भेगा जातात किंवा काही डिर्टंजंट पावडरमुळे पाय सोलवटून जातात. त्यामुळे पायांकडे विशेषत:टाचांकडे नियमित लक्ष देणं महत्त्वाचे आहे. काही सोप्या स्टेप्स रोजच्या रूटीनमध्ये केल्यास पायांच्या भेगा कायमच्या दूर होऊ शकतात.

फाटलेल्या टाचांसाठी  5 सोप्या टिप्स

1. कोमट पाण्यात पाय भिजवा

Loading...

सर्वात आधी पाय 10 ते 15 मिनिटं कोमट पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे पायावरील मृत त्वचा, कोरडी त्वचा मऊ होण्यास सुरूवात होते. यानंतर जे हवे असतील ते प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकता. ही टिप्स केल्याने त्या प्रोडक्ट्सचा अधिक फायदाही तुम्हाला जाणवू शकतो.

२. हलक्या हाताने स्क्रब करा

पाय भिजवल्यानंतर प्यूमिक स्टोन किंवा फुट स्क्रबचा वापर करता येतो. मात्र हे करताना खूप जोराने घासू नक. टाचांना आधीच जास्त भेगा पडल्या असतील तर जोरात घासल्याने त्या आणखी वाढू शकतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा एक्सफोलिए़ट करणे पुरेसं आहे.

3. रात्री मॉइश्चरायझर लावा

टाचांची कोरडी त्वचा मऊ ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी जाडसर क्रिम लावा. युरीया, लॅक्टिक अॅसिड किंवा शिया बटर असलेली क्रिम वापरू शकता.क्रिम टाचांवर लावल्यानंतर काही वेळ ती त्वचेत शोषली जाऊ द्या.

 

4.कॉटनचे मोजे घाला

क्रिम लावल्यानंतर कॉटनचे मोजे घातल्याने पायांवरील मॉइश्चर टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.रात्री झोपताना पायात मोजे घालूनच झोपा म्हणजे त्वचा कोरडी पडणार नाही.

5. नियमित हे उपाय करणे गरजेचे

टाचा एका रात्रीत मऊ होत नाहीत. त्यामुळे काही दिवस उपाय करून लगेच परिणाम मिळेल याची अपेक्षा न करता नियमितरपणे पायांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.साधारणपणे 7 ते 10 दिवस हे रूटीन नियमितपणे फॉलो करावे.

पायांच्या भेगा कायमच्या गायब करणारा घरगुती उपाय

वॅसलीन, नारळाचं तेल, बेकिंग सोडा, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि थोडं वितळेलेले मेण एकत्र करून मिश्रण तयार करा. आणि हे पॅक पायाला २० मिनिटे लावून ठेवा.पायाला लावल्यानंतर काही मिनिटे कापडाने गुंडाळून ठेवा. हे मिश्रण सुकल्यावर कपडा काढा.यामुळे कोरडेपण गायब होईल आणि टाचेला पडलेल्या भेगा देखील कमी होतील.

 

 

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us