शरीराच्या वजनानुसार रोज किती पाणी प्यायला हवं? फायदे जाणून आश्चर्य वाटेल

डॉक्टरांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांच्या तोंडातून आपण हे ऐकलं असेल की पाणी पिणे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे असते. पण त्याचं योग्य प्रमाण माहित असणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. मुख्य म्हणजे शरीराच्या वजनानुसार किती पाणी पिणे महत्त्वाचे आहे. हे जाणून घेऊयात.

शरीराच्या वजनानुसार रोज किती पाणी प्यायला हवं? फायदे जाणून आश्चर्य वाटेल
How much water should you drink per day by weight?
Image Credit source: Meta AI
| Updated on: Jul 02, 2025 | 1:58 PM

डॉक्टरांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांच्या तोंडातून आपण हे ऐकलं असेल की पाणी पिणे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे असते. पण ते पाणी कसंही आणि कितीही पिऊन उपयोग नाही. त्याचं योग्य प्रमाण माहित असणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. दिवसभर शरीर हायड्रेट राहावे म्हणून तर आपल्या शरीरासाठी पाणी फारच आवश्यक असतं. सामान्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पुरुषांनी सुमारे 3.7 लिटर म्हणजेच 13 ग्लास पाणी प्यावे आणि महिलांनी सुमारे 2.7 लिटर म्हणजेच 9 ग्लास पाणी दररोज प्यावे. पण यापद्धतीने पाणी पिणे सर्वांसाठी सारखं नाही. एखाद्या व्यक्तीने किती पाणी प्यावे हे वय, वजन, आरोग्य स्थिती आणि शारीरिक हालचालींची पातळी यासारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत, आज आपण वजनानुसार एखाद्या व्यक्तीने किती पाणी प्यावे हे जाणून घेऊ.

शरीराच्या वजनाच्या प्रमाणात तुम्ही दिवसातून किती पाणी प्यावे?
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एकाभ्यासानुसार, निरोगी आयुष्यासाठी तुम्ही दररोज किती पाणी प्यावे हे तुमच्या शरीराचे वजन ठरवते. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही एक साधी गणना करावी. जी खालीलप्रमाणे आहे: –
प्रथम तुमचे वजन मोजा, ​​नंतर ते ⅔ ने गुणा. आता, तुमच्या वर्कआउटच्या दर 30 मिनिटांनी 0.35 लिटर पाणी त्यात समाविष्ट करा. त्यामुळे तुम्हाला दररोज किती पाणी प्यावे याचा अंदाजा येईल.

तुमच्या शरीराच्या वजनानुसार दररोज सरासरी किती पाणी पिण्याची आवश्यकता आहे?

45.35 किलो – 1.98 लिटर
49.89 किलो – 2.18 लिटर
50 ते 54 किलो – 2.36 लिटर
58 ते 60 किलो – 2.57 लिटर
60 ते 65 किलो -2.77 लिटर
68 ते 70 किलो -2.95 लिटर
72 ते 75 किलो- 3.16 लिटर
77 ते 80 किलो – 3.37 लिटर
81 ते 85 किलो -3.56 लिटर
86 ते 89 किलो – 3.56 लिटर
90 ते 95 किलो – 4.73 लिटर
95 ते 98 किलो -4,55 लिटर
99 ते 103 किलो – 4.76 लिटर
104 ते 105 किलो – 4.36 लिटर
106 ते 108 किलो – 4.55 लिटर
109 ते 113 किलो -4.76 लिटर

गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी किती पाणी प्यावे?
पाण्याची दैनंदिन गरज तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावर देखील अवलंबून असते. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये पाण्याची गरज त्याच वयाच्या गर्भवती नसलेल्या महिलांपेक्षा वेगळी असते. ESAF (इव्हँजेलिकल सोशल अॅक्शन फोरम) नुसार, गर्भवती महिलांमध्ये पाण्याची दैनंदिन गरज 2.30 लिटर/दिवस आहे आणि स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये 2.60 लिटर/दिवस आहे. गर्भवती महिलांमध्ये पाण्याची दैनंदिन पाण्याची गरज 2.60 लिटर/दिवस आहे आणि स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये पाण्याची गरज 3.40 लिटर/दिवस आहे.

पण अर्थात प्रेग्नंसीदरम्यान महिलांनी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला याबाबत नक्कीच घ्यावा. कारण प्रत्येक महिलेचं शरीर हे वेगवेगळं असतं.

पाणी पिणे का महत्त्वाचे आहे?
शरीराला सतत हायड्रेट ठेवणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, कारण पाणी पचन, बद्धकोष्ठता रोखणे, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके स्थिर करणे, सर्व पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवणे, सांधे निरोगी ठेवणे, गंभीर आजारांचा धोका कमी करणे आणि शरीराचे तापमान नियंत्रित करणे यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत, प्रत्येक व्यक्तीला पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

दिवसातून किती पाणी प्यावे?
तुमच्या शरीराला किती पाण्याची आवश्यकता आहे हे तुमचे वजन, वय आणि लिंग यावर अवलंबून असते. तथापि, मानवी शरीराला सरासरी दररोज 6 ते 8 ग्लास पाण्याची आवश्यकता असते.

स्त्रीने किती पाणी प्यावे?
सरासरी, एका महिलेला तिच्या शरीराच्या वजनाच्या अर्धा ते दोन तृतीयांश पाणी लागते. पण जसं म्हटलं तस प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं त्यामुळे त्यानुसार पाणी पिण्याची मात्राही ठरवावी. हा पण किमान दिवसातून 6 ग्लास तरी पाणी पिणे गरजेचे आहे.

(डिस्क्लेमर: वरील माहिती ही उपलब्ध स्त्रोतांवरून घेतली आहे. त्यामुळे अधिक माहिती हवी असल्यास , किंवा कोणत्या आजाराची ट्रीटमेंट सुरु असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.)