किती दिवसात धुवाव्यात बेडशीट? तज्ञांनी सांगितली योग्य वेळ आणि त्यामागील आरोग्याशी निगडीत कारणं

तुमच्या घरातील बेडशीट काही दिवसांनी बदलणे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. चला तर मग तज्ञांच्या नुसार बेडशीट किती दिवसांनी बदलावी आणि त्यामागील आरोग्याशी निगडीत कोणती कारणं आहेत ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

किती दिवसात धुवाव्यात बेडशीट? तज्ञांनी सांगितली योग्य वेळ आणि त्यामागील आरोग्याशी निगडीत कारणं
Bed Sheets
Image Credit source: tv9 telugu
| Edited By: | Updated on: Feb 28, 2026 | 8:40 PM

आपण प्रत्येकजण आपापल्या घरातील बेडवर बेडशीट नक्कीच घालतो. ज्यामुळे खोलीचे सौंदर्य वाढते. तसेच रोजच्या धावपळीत जेव्हा आपण थकून घरी येतो तेव्हा बेडवर आपलं थकलेलं शरीर टाकावं हे नेहमीच सगळ्यांना वाटत असतं. अशातच प्रत्यक्षात पाहिलं तर बेडशीट ही आपल्या त्वचेच्या आरोग्याशी, श्वसनाशी आणि एकूणच तब्येतीशी निगडीत असते. कारण झोपल्यावर आपल्या शरीरातील घाम, मृत त्वचा गळणे, केस गळणे आणि खोलीतील धुळ हे सर्व या चादरींवर जमा होते. नाही तर तुमच्या घरात पाळीव प्राणी किंवा लहान मुलं असेल तर बेडशीट लवकर खराब होते.

त्यातच बेडशीट वरील घाण डोळ्यांना दिसत नाही. म्हणून बेडशीट्स नियमितपणे काही दिवसांनी बदलणे गरजेचं आहे. तसेच बेडशीट्स धुण्यामुळे बॅक्टेरिया कमी होतात, दुर्गंधी दूर होते आणि ॲलर्जीचा धोका देखील कमी होतो. स्वच्छ बेडशीट्स देखील चांगली झोप वाढवतात आणि त्वचेच्या समस्या कमी करू शकतात. बेडशीट्स किती दिवसांनी बदलल्या पाहिजेत याबद्दल तज्ञांचे काय मत आहे ते जाणून घेऊयात.

तज्ञांच्या मते आठवड्यातून एकदा बेडशीट्स बदलणे आणि धुणे सर्वोत्तम मानले जाते. यामुळे घाम, मृत त्वचा, धूळ आणि बॅक्टेरिया जमा होण्यास  प्रतिबंध होतो. यामुळे बेड स्वच्छ राहतो आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत नाही.

एका सर्वेक्षणानुसार बरेच लोकं दर 24 दिवसांनी किंवा दर 3 ते 4 आठवड्यांनी त्यांच्या बेडशीट्स बदलतात. तज्ञांच्या नुसार ही एक चांगली सवय नाही. चांगल्या आरोग्यासाठी ही सवय नक्की बदला.

बेडशीट्स किती दिवसामध्ये बदलावी?

कधी कधी आठवड्यातून एकदा बेडशीट बदलणे देखील पुरेसे नसते. जर तुम्हाला खूप घाम येत असेल, घरात लहान मुलं किंवा पाळीव प्राणी तुमच्या बेडवर झोपत असतील आणि त्यात तुमची त्वचा संवेदनशील असेल किंवा तुम्ही सतत आजारी असाल, तर बेडशीट अधिक वेळा बदलल्या पाहिजेत. अशा परिस्थितीत जंतू आणि ॲलर्जीचा धोका कमी करण्यासाठी आठवड्यातून 2-3 वेळा बेडशीट बदलणे चांगले मानले जाते.

बेडशीट स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या टिप्स:

  1. फक्त बेडशीट धुणे पुरेसे नाही. तर खोलीतील योग्य स्वच्छता देखील आवश्यक आहे.
  2. बेडशीट धुतल्यानंतर ती पूर्णपणे वाळवा, कारण ओल्या चादरीत बॅक्टेरिया लवकर वाढतात.
  3. झोपण्यापूर्वी आंघोळ करणे किंवा स्वच्छ कपडे परिधान करणे देखील आरोग्यासाठी उत्तम असते.
  4. तसेच बेडवर बसुन कोणतेही पदार्थ न खाण्याचा प्रयत्न करा आणि पाळीव प्राण्यांना वेगळे झोपवा.
  5. फक्त बेडशीटच नाही तर इतर वस्तू देखील स्वच्छ करणे महत्वाचे आहे. उशीचे कव्हर आठवड्यातून एकदा बदलले पाहिजेत. ड्युवेट्स किंवा कम्फर्टर दर काही महिन्यांनी धुवावेत. नियमित स्वच्छतेसह चांगल्या दर्जाची बेडशीट 2-3 वर्षे आरामात टिकू शकते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Follow Us