‘या’ सोप्या पद्धतीने मिळवा लांब, दाट आणि मऊ केस!

महिला नेहमीच आपल्या केसांची काळजी घेण्याच्या टिप्स शोधत असतात. अशावेळी जर तुम्हीही अशी देशी रेसिपी शोधत असाल तर ही इच्छा पूर्ण होऊ शकते. होय, आम्ही तुम्हाला इथे अशी एक देसी रेसिपी सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही दाट आणि लांब केस मिळवू शकता.

या सोप्या पद्धतीने मिळवा लांब, दाट आणि मऊ केस!
grow hair faster
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 15, 2023 | 12:32 PM

मुंबई: आजच्या काळात लांब केस कोणाला नको असतात? त्याचबरोबर लांब केसांची आवड असणाऱ्या महिला नेहमीच आपल्या केसांची काळजी घेण्याच्या टिप्स शोधत असतात. अशावेळी जर तुम्हीही अशी देशी रेसिपी शोधत असाल तर ही इच्छा पूर्ण होऊ शकते. होय, आम्ही तुम्हाला इथे अशी एक देसी रेसिपी सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही दाट आणि लांब केस मिळवू शकता. दुधाने केसांना प्रोटीन ट्रीटमेंट द्या. कशी? जाणून घेऊया…

साहित्य

एक अंडी, एक कप कच्चे दूध, एक चमचा खोबरेल तेल, अर्धा कप गाजराचा रस, एक चमचा मध.

लावण्याची पद्धत

  1. एक वाटी घेऊन त्यात अंडी फोडून त्याचा पिवळा भाग वेगळा करावा. कारण केसांना पिवळा भाग लावल्याने केसांमधून घाणेरडा वास येईल. तो वास लवकर जाणार नाही.
  2. आता एका भांड्यात खोबरेल तेल, गाजराचा रस आणि दूध मिक्स करा. आता हा पॅक हेअर ब्रश आणि कंगव्याच्या मदतीने केसांना लावा.
  3. हे मिश्रण केसांमध्ये 2 मिनिटं ते एक तास लावा, त्यानंतर केस चांगले धुवा.

फायदे

  • या हेअर मास्कमुळे केसांना जास्त प्रमाणात प्रोटिन मिळेल आणि केसांची वाढ चांगली होईल.
  • तुमच्या केसांचा डलनेस दूर होईल आणि केस चमकतील. इतकंच नाही तर केस दाट आणि मजबूत होतील.
  • केस मऊ करण्यासाठीही हा हेअर पॅक फायदेशीर ठरतो. तसेच केस गळण्याची समस्याही कमी होते.
  • जर तुम्हाला स्प्लिट एंड्सचा त्रास होत असेल तर हा हेअर पॅक तुम्हाला या समस्येवर मात करण्यास मदत करेल.