AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कहानी पूरी फिल्मी…1 कोटींसाठी रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव, दुसऱ्याला संपवून.. ‘त्या’ पुराव्याने पलटला खेळ

लातूरमध्ये 1 कोटी इन्श्युरन्ससाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. कर्जातून मुक्त होण्यासाठी गणेश चव्हाणने एका निष्पाप व्यक्तीचा खून करून त्याला जळालेल्या कारमध्ये ठेवले. पोलिसांनी हा अपघात मानला, पण तपासानंतर धक्कादायक सत्य समोर आले.

कहानी पूरी फिल्मी...1 कोटींसाठी रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव, दुसऱ्याला संपवून.. 'त्या' पुराव्याने पलटला खेळ
लातूर क्राईम
| Updated on: Dec 16, 2025 | 12:23 PM
Share

A Sensational Story of Murder : महाराष्ट्रातल्या लातूरमध्ये उघड झालेल्या एका खळबळजनक गुन्ह्याने पोलिसही हैराण झाले आहेत. 1 कोटी रुपयांच्या इन्श्योरन्सचे पैसे मिळवण्यासाठी एका इसमाने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचत अतिशय फिल्मी स्क्रीप्ट लिहीली. त्या प्लानमध्ये जे जे लिहीलं होतं, त्याने सगळं तसंच केलं, पण क्लायमॅक्स जवळ आल्यावर पोलिसांचा हाती असा पुरावा सापडला, ती एका क्षणात सगळा खेलच पलटून गेला. त्यानंतर जो खुलासा झाला, त्याने सगळ्यानांच धक्का बसला. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या इसमाने इन्श्योरन्सचे 1 कोटी रुपये मिळवण्यासाठी फक्त पोलिसांना चकमा दिला नाही, तर एक निरपुराध व्यक्तीचाही जीव घेतल्याचे उघड झालं.

खरंतर ही घटना लातूर जिल्ह्यातील औसा तहसीलमध्ये घडली. या परिसरातून जाणाऱ्या वानवाडा पाटी-वानवाडा रस्त्यावर पोलिसांना एक जळालेली कार आढळली. कारच्या आतून एका पुरूषाचा वाईटरित्या जळालेला मृतदेहही सापडला. सुरूवातीला पोलिसांना हे प्रकरण अपघाताचं वाटलं आणि त्यांनी तसा एनडीआक दाखल केला. तपासात असे दिसून आले की ही कार औसा तांडा येथील रहिवासी बळीराम गंगाधर राठोड यांच्या नावावर रजिस्टर्ड होती. पण घटनेच्या दिवशी ही कार त्यांचे मेहुणे गणेश गोपीनाथ चव्हाण यांच्याकडे होती. 13 डिसेंबर रोजी रात्री 19 वाजताच्या सुमारास ते लॅपटॉप देण्याबद्दल सांगून घरातून निघाले, मात्र ते परत आलेच नाहीत.

कहानी पूरी फिल्मी निकली..

घटनास्थळी सापडलेल्या एका ब्रेसलेटवरून गाडीत सापडलेला मृतदेह गणेशचा असल्याचे ओळखण्यात आले. पण ही कहाणी तिथेच संपली नाही. तपासादरम्यान, पोलिसांसमोर काही तथ्यं उघडकीस आली, जी पचवणं लातूर पोलिसांसाठी कठीण होतं. काही संशयास्पद गोष्टींमुळे क्राईम ब्रांचने पुन्हा तपास सुरू केला. त्यानंतर मोबाईल लोकेशन आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स यामुळे धक्कादायक सत्य उघड झालं. जो गणेश चव्हाण अपघाता मरण पावला असं लोकांना वाटतं होतं, तो खरंतर जिवंत होता. क्राईम ब्रांच टीमने सिंधुदुर्गमधून त्याला शोधून काढलं. त्यानतंर चौकशीदरम्यान गणेशने जी कबूली दिली, ती कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल.

आर्थिक तंगीचा सामना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करत होता. त्याच्यावर अंदाजे 57 लाखांचे कर्ज होते आणि त्याने तीन वर्षांपूर्वी 1 कोटी रुपयांचा टर्म इन्श्योरन्स काढला होता. कर्जातून सुटका व्हावी म्हणून आणि कुटुंबाला हे पैसे मिळावेत म्हणून त्यानेच हा भयानक प्लान रचला. 13 डिसेंबरच्या रात्री तो औसा येथील यकटपूर रोड चौकात पोहोचला, जिथे त्याने दारू पिलेल्या गोविंद किशन यादव (वय 50) याला औसा किल्ल्यावर सोडण्यासाठी लिफ्ट दिली. वाटेत ते एका ढाब्यावर थांबले, दोघांनी जेवण केलं आणि नंतर निर्जन वानवाडा रस्त्यावरून ते निघाले. कारमध्ये बसताच यादव झोपी गेला.

कारला आग लावून काढला पळ

तिथेच गणेशने त्याचा प्लान प्रत्यक्षात आणला. त्याने गोविंद यादवला ड्रायव्हरच्या सीटवर ओढले आणि तिथे बसवून त्याला सीटबेल्ट बांधला. त्यानंतर त्याने प्लास्टिकची पिशवी आत ठेवली, ती पेटवली आणि पेट्रोल टाकीचे झाकण उघडे ठेवून घटनास्थळावरून पळून गेला. गाडीचा लागलेल्या आगीत यादवचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर गणेश हा घटनास्थळावरीन फरार होऊन तुळजापूरला पोहोचला, तिथून तो खासगी बसने कोल्हापूर आणि तिथून विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) येथे गेला. मात्र नशिबाने त्याची साथ दिली नाही. लातूर पोलिसांनी 24 तासांच्या आतच या प्रकरणाचा छडा लावत सत्य उघडकीस आणलं आणि गणेश याला अटक केली.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.