AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : भारतावर नवीन संकट, सच्चा मित्र रशियाच भक्कमपणे पाठिशी उभा राहील, भारताकडून Action प्लानवर काम सुरु

Iran Israel War : मध्य पूर्वेत सुरु असलेलं युद्ध भयंकर वळणावर येऊन ठेपलय. भारताला नव्या संकटाची चाहूल लागलीय. त्यामुळे भारताने आतापासून Action प्लानवर काम सुरु केलय. यात रशियाची साथ मिळणं खूप गरजेच आहे.

Iran Israel War : भारतावर नवीन संकट, सच्चा मित्र रशियाच भक्कमपणे पाठिशी उभा राहील, भारताकडून Action प्लानवर काम सुरु
Putin-Modi
| Updated on: Mar 19, 2026 | 10:40 PM
Share

मध्य पूर्वेत इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण सुरु असलेलं युद्ध आता तेलाच्या लढाईत बदलू लागलं आहे. सुरुवातीला परस्परांच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. इराणने आपल्या बचावाच्या रणनितीचा भाग म्हणून स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद केलं. तिथून जाणाऱ्या तेल जहाजांवर हल्ले केले. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून होणारी तेल वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. म्हणून अमेरिकेने मागच्या आठवड्यात इराणच्या खर्ग बेटावर हल्ला चढवला. हे इराणचं मुख्य तेल निर्यात केंद्र आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. खर्ग बेटावरील फक्त लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलय. तेल सुविधा प्रकल्पांना हात लावलेला नाही असं ट्रम्प म्हणाले. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज इराणने सुरु करावं यासाठी तो इशारा होता.

त्यानंतर इराणकडून क्लस्टर बॉम्बने हल्ले सुरु असल्यामुळे इस्रायलने बुधवारी इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर हल्ले केले. त्यानंतक इराणने प्रत्युत्तर म्हणून आखाती देशातील तेल-गॅस प्रकल्पांवर हल्ले करण्याची धमकी दिली. त्यानुसार त्यांनी सौदी अरेबिया आणि कतरच्या प्रकल्पांवर हल्ले केले. भारताला कतरच्या ज्या गॅस प्रकल्पातून पुरवठा होतो तिथे हे हल्ले केले. परिणामी आज तेलाचे भाव भडकले. शेअर बाजार कोसळले. परिणामी ही लढाई ऊर्जा युद्धात बदलली तर जगासमोर गंभीर संकट निर्माण होऊ शकतो. पंधरा दिवसाच्या युद्धानंतर भारतात एलपीजीची काय स्थिती झालीय ते चित्र आपल्या नजरेसमोरच आहे.

भारताकडून चाचपणी सुरु

कतर आणि अन्य आखाती देशामधून एलपीजी, एलएनजी गॅस पुरवठा बाधित झाल्यास भारतात काय स्थिती निर्माण होऊ शकते, याची केंद्र सरकारला कल्पना आहे. यासाठी केंद्राने आत्तापासूनच पावलं उचलायला सुरुवात केली आहे. भारताने पर्यायी एलपीजी कुठून उपलब्ध होऊ शकतो त्याची चाचपणी सुरु केली आहे.

भारताची भूमिका काय?

ठराविक देशांवरच अवलंबून न राहता नवीन पुरवठादार शोधायला सुरुवात केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. “ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी भारताची रशियाकडून एलपीजी गॅस विकत घेण्याची इच्छा आहे” असं साप्ताहिक पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेने सवलत दिल्यानंतर भारताने तेलाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून आधीच रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे.

“जिथे कुठे एलपीजी उपलब्ध आहे तिथून आम्ही तो खरेदी करण्याचा प्रयत्न करतोय. रशियाकडे असेल तर आम्ही तिथे जाऊ. सध्याच्या परिस्थितीत आमच्या लोकांच्या इंधनाच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होणं गरजेचं आहे” असं रणधीर जैस्वाल म्हणाले.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?