AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?

तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?

| Updated on: Aug 08, 2026 | 5:22 PM
Share

तुकाराम मुंढे हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांना कारवाईसंदर्भात ‘एखाद्या डिशमध्ये कॉक्रोच आला तर काय होतं?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ‘असं तुम्हाला कारवाई करताना म्हणत नाहीत का?’ असा सवालही करण्यात आला.

तुकाराम मुंढे हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत. महत्त्तवाचं म्हणजे त्यांच्या शैलीची आणि कामकाज करण्याची चर्चा सध्या राज्य भर आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांना कारवाईसंदर्भात ‘एखाद्या डिशमध्ये कॉक्रोच आला तर काय होतं?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ‘असं तुम्हाला कारवाई करताना म्हणत नाहीत का?’ असा सवालही करण्यात आला.

यावर उत्तर देताना तुकाराम मुंढे म्हणाले, “कॉक्रोच काय असत? हे आपण पाठीमागच्या दिवसात बघितला आहे.” पुढे ते म्हणाले, “कॉकरोच काय असतं हे आपल्याला पाठीमागच्या दिवसात कळला आहे. त्याला कुठेही फिरा तिथून तो जन्म घेतो.” त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

दरम्यान, हायकोर्टाच्या कँटीनवर झालेल्या इन्स्पेक्शनबाबतही त्यांनी माहिती दिली. हे तपासणीचे काम नियमानुसार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आदल्या दिवशी सुनावणीदरम्यान कोर्टाने केवळ प्रायव्हेट ठिकाणी तपासणी करता की शासकीय ठिकाणीही, असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आली. तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयासह FDAच्या कँटीनचीही तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Aug 08, 2026 05:22 PM

Follow Us