AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या शहर आणि जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, ४.३ रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याने घबराट

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने घबराट पसरली आहे. हे भूकंपाचे धक्के ४.३ रिश्टर स्केल असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

नाशिकच्या शहर आणि जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, ४.३ रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याने घबराट
nashik earthquake
| Updated on: Aug 08, 2026 | 10:57 PM
Share

नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने घबराट पसरली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात गेले काही दिवस भूकंपाचे धक्के जाणवत होते. आजही नाशिक जिल्ह्यातील शहरी भागातही भूकंपाचा धक्का जाणवल्याने घबराट पसरली आहे. गेले काही दिवस ग्रामीण भागात जाणवलेले धक्के आता शहरी भागातही जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

नाशिकच्या ग्रामीण भागात यापूर्वी भूकंपाचे धक्के काही दिवसांपासून जाणवत होते. मात्र आज रात्री १०.१० मिनिटांनी शहरी भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक भागात घरातील भांडी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात धक्के जाणवले होते. आता नाशिकच्या शहरी भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

नाशिक शहरातील इंदिरानगर परिसर, मेन रोड परिसर, पंचवटी, हिरावाडी, पाथर्डी पाडा परिसरासह या शहरी भागासह ग्रामीण भागातील कसारा घाटापासून रामशेत किल्ल्याच्या परिसरात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाची तीव्रता कमी होती. रिश्टर स्केलवर ती ४.३ असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरुन जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.  मात्र, प्रशासनाने या प्रकरणात आता दक्षता बाळगण्यास सुरुवात केली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना