AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातच्या मोरबीत विहिरीच्या पाण्यात लाटांची निर्मिती, तपासात हे निघाले कारण…

शेतकरी सदारिया म्हणाले की, ही विहीर त्यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी बांधली होती. पाण्यातील हालचाल सर्वप्रथम रविवार आणि सोमवारी लक्षात आली. मंगळवारी ही हालचाल थोड्या काळासाठी थांबली, परंतु बुधवार आणि गुरुवारी ती पुन्हा सुरू झाली, ज्यामुळे लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

गुजरातच्या मोरबीत विहिरीच्या पाण्यात लाटांची निर्मिती, तपासात हे निघाले कारण...
Waves form in well water in Morbi
| Updated on: Aug 07, 2026 | 10:59 PM
Share

गुजरातच्या मोरबी येथे एका विहिरीच्या पाण्यात समुद्राच्या सारख्या लाटा तयार झाल्याचा अजब प्रकरण उघडकीस आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून विहिरीतील पाणी अशा प्रकारे उचंबळू लागल्याने या भागात हा कुतुहलाचा विषय बनला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मोरबीचे कलेक्टरनी या विहिरीचे तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. या १८ फूट खोल विहिरीचे पाणी अचानक लाटांसारखे हलत आहे. या विहीरीचे पाणी पाहायला आता गर्दी होऊ लागली आहे. कलेक्टर स्वप्नील खरे यांच्या आदेशानंतर भू-संशोधकांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

मोरबी तहसीलच्या वीरपरडा गावातील प्रांजीवन सदारिया यांच्या शेतातील ही अजब विहीर अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली आहे. विहिरीचे पाणी हलू लागल्याने या परिसरात भूकंपाचा दहशत पसरली आहे. पाण्याची ही हालचाल भूकंपाच्या लहरीमुळे होत असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी भूकंपाचे कोणताही संबंध यामागे नसल्याचे म्हटले आहे. सुरुवातीच्या तपासानुसार ही एक नैसर्गिक भूवैज्ञानिक प्रक्रिया म्हटली जात आहे.

भू-संशोधकांनी या विहिरीची तपासणी केली आहे. मोठ्या पावसाने विहिरीचे झरे सुटून पाणी भरले असावे आणि हवेच्या कारणांनी त्यात लाटा येत असाव्यात असा संयश व्यक्त केला जात आहे. या घटनेमागे भूकंपाच्या लहरींचा काही संबंध असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे मोरबी येथील जिओलॉजिस्ट जे.एस.वाढेर यांनी सांगितले. मात्र, या घटनेचा आणखीन तपास केला जात असून निरीक्षण केले जात आहे. या विहिरीचे मालक प्रांजिवन सदारिया यांच्या मते त्यांनी पहिल्यांदा २ ऑगस्ट रोजी हा चमत्कार पाहिल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की मी जेव्हा रविवारी माझ्या शेतावर पोहचलो तर विहिरीचे पाणी किनाऱ्यावरुन वाहत होते. तेव्हापासून असे होत आहे.

विहिरीच्या पाण्यात उसळी

या मागे कोणतीही भूकंपाच्या लहरींचा संबंध नाही. तर प्रथमदृष्ट्या असे निदर्शनास आले आहे की जास्त पावसाने भुजलाची पातळी वाढली आहे. आणि जमीनीच्या आत कातळातील रिकाम्या जागात ( पोर स्पेस ) अडकलेली हवा त्यामुळे बाहेर पडत आहे. ज्यामुळे विहिरीच्या पाण्यात उसळी येत आहे. गांधीनगरातील इंस्टीट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्च (ISR)च्यानुसार या भागात कोणतीही सक्रीय फॉल्ट लाईन ( भूकंपाच्या फटी ) नाहीत. भुजल पुन्हा भरल्याचे ( ग्राऊंड वॉटर रिचार्ज )संभाव्य कारण मानले जात आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा