AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War Update : इस्रायलच्या हल्ल्याचा भारताला बसला पहिला मोठा फटका, धोक्याची घंटा

Iran-Israel War Update : मध्य पूर्वेतील युद्धाची भारताला आधीच झळ बसत आहे. येणाऱ्या दिवसात अजून गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्रायलने काल रात्री एक हल्ला केला. त्याचा भारताला पहिला मोठा फटका बसला आहे.

Iran-Israel War Update : इस्रायलच्या हल्ल्याचा भारताला बसला पहिला मोठा फटका, धोक्याची घंटा
middle east oil war
| Updated on: Mar 19, 2026 | 10:04 AM
Share

मध्य पूर्वेत सुरु असलेलं युद्ध दिवसेंदिवस अजून भीषण होत चाललं आहे. सुरुवातीला परस्परांच्या लष्करी तळांवर हल्ले केले. आता ही लढाई ऊर्जा ठिकाणांवर हल्ल्या करण्यामध्ये बदलू लागली आहे. अमेरिकेने मागच्या आठवड्यात इराणच्या खार्ग बेटावर हल्ला केला. हे इराणचं मुख्य तेल निर्यात केंद्र आहे. अमेरिकेने सांगितलं आम्ही खार्ग बेटावरील लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलं, तेलाच्या सुविधांना हात लावला नाही. एकप्रकारे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद ठेवणाऱ्या इराणला तो इशारा होता. त्यानंतर काल इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर हल्ले केले.अमेरिका-इस्रायलने पहिल्यांदा इराणच्या नैसर्गिक वायूच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे.

या हल्ल्यामुळे भडकलेल्या इराणने सौदी अरेबिया, कतर आणि यूएईच्या तेल व गॅस ठिकाणांना टार्गेट करण्याची धमकी दिली होती. त्यानुसार इराणने कतर आणि सौदी अरेबियाच्या गॅस प्रकल्पांवर हल्ले केले आहेत. परिणामी जगभरात गॅस तुटवड्याच संकट अजून गंभीर होऊ शकतो. इराणने कतरच्या गॅस प्रकल्पावर हल्ला केला आहे. भारताचा 47 टक्के एलपीजी कतरच्या गॅस प्रकल्पातून येतो. हा भारतासाठी मोठा झटका आहे. तिथे उत्पादन कमी झाल्यास भारताला याची झळ बसू शकते.

युद्ध आता तेल युद्धामध्ये बदलू लागलय

इस्रायलने इराणच्या गॅस प्रकल्पावर केलेला हल्ला आणि इराणने दिलेलं प्रत्युत्तर याचा भारतीय शेअर बाजारात लगेच परिणाम दिसून आलाय. भारतीय शेअर बाजाराला याचा मोठा फटका बसला आहे. मागच्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. मिडिल-ईस्टमध्ये सुरु असलेलं युद्ध आता तेल युद्धामध्ये बदलू लागलं आहे.

सेंसेक्स किती अंकांनी कोसळला

आखाती देशातील तेल आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. अचानक Brent Crude Price 113 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचली आहे. आशिया बाजारात याचे पडसाद पहायला मिळतायत. आज भारतीय शेअर बाजार उघडताच कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्स वाला सेंसेक्स इंडेक्स (BSE Sensex) गुरुवारी बाजार उघडताच 1900 अंकांनी कोसळला. नॅशनल स्टॉक एक्सजेंचा निफ्टी सुद्धा 550 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम