AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran War Update : अखेर भारताने उचललं मोठ पाऊल, ट्रम्प जगाकडे मदत मागत बसले भारतीय नौदलाने थेट युद्धक्षेत्रात…

Iran War Update : भारताने आपली संकल्प शक्ती दाखवून दिली आहे. मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे भारतासमोरही काही समस्या निर्माण झाल्या आहेत. भारत सरकार आपल्यापरीने संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. पण आपलं हित जपण्यासाठी भारत सरकारची काय तयारी आहे, त्याची झलक दिसून आलीय.

Iran War Update : अखेर भारताने उचललं मोठ पाऊल, ट्रम्प जगाकडे मदत मागत बसले भारतीय नौदलाने थेट युद्धक्षेत्रात...
Warship
| Updated on: Mar 19, 2026 | 9:20 AM
Share

मिडिल ईस्टमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली समुद्री सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठा मजबूत करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय नौदलाने ओमानची खाडी आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जवळ आपल्या युद्धनौकांची संख्या वाढवली आहे. या भागातून तेल-गॅस वाहतुकीला असलेला धोका लक्षात घेऊन भारतीय नौदलाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय झेंडा असलेले टँकर्स आणि जहाजांना सुरक्षित भारतात आणणं हा नौदलाचा मुख्य उद्देश आहे. याच सुरक्षा घेऱ्यातून INS शिवालिक, आयएनएस सुनयना आणि जग लाडकी ही जहाजं सुरक्षितरित्या भारतीय बंदरात पोहोचली आहेत.

2019 पासून मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट नुसार या क्षेत्रात सामान्यत: भारताच्या 1 ते 3 युद्धनौका तैनात असतात. पण आता यांची संख्या पहिल्यापेक्षा वाढवण्यात आली आहे. किती युद्धनौका नेमक्या तैनात केल्या आहेत, ते सुरक्षा कारणांमुळे सांगितलेलं नाही. भारतीय जहाजांना धोकादायक भागातून सुरक्षितरित्या बाहेर काढणं हे तैनात युद्धनौकांचं मुख्य काम आहे. सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये भारताची 22 जहाजं आहेत. भारतीय नौदलाचं या स्थितीवर अत्यंत बारीक लक्ष आहे.

दोन मोठी ऑपरेशन्स सुरु

भारतीय नौदलाकडून सध्या दोन मोठी ऑपरेशन्स सुरु आहेत. पहिल ऑपरेशन संकल्प. ओमानच्या खाडीत हे सुरु आहे. पायरसी विरुद्ध हे ऑपरेशन आहे, अदनच्या खाडीत समुद्री डाकूंना रोखण्यासाठी हे ऑपरेशन चालवलं जात आहे.

भारताने यातून काय संकेत दिले?

2017 पासून भारतीय नौदल मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट अंतर्गत 6 प्रमुख समुद्री भागात सतत तैनात असते. या अंतर्गत युद्धनौका या मित्र देशांसोबत युद्ध सराव करतात. आपातकाळात मदत आणि बचाव कार्याचं अभियान चालवतात. वाढत्या क्षेत्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने हे रणनितीक पाऊल उचललं आहे. भारताने आम्ही आमची जहाजं आणि तेल पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रसंगी आवश्यक पावलं उचलू शकतो हे संकेत दिले आहेत. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील जल वाहतूक रोखून धरली आहे. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांकडे मदत मागितली आहे. त्यांना त्यांच्या युद्धनौका उतरवण्याचं आवाहन केलय. पण नाटो देशांनी ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना