AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War : भिती होती तेच घडलं, युद्धात इस्रायलने नको ते पाऊल उचललं, डाव उलटला तर भारताचं मोठं नुकसान

Iran-Israel War : इस्रायलने युद्धात एक डेंजर पाऊल उचललं आहे. हा डाव उलट पडला, तर भारताची हालत होईल. मध्य पूर्वेतील इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध आता एका खतरनाक वळणावर येऊन पोहोचलय.

Iran-Israel War : भिती होती तेच घडलं, युद्धात इस्रायलने नको ते पाऊल उचललं, डाव उलटला तर भारताचं मोठं नुकसान
benjamin netanyahu
| Updated on: Mar 18, 2026 | 10:31 PM
Share

मध्य पूर्वेत सुरु असलेलं युद्ध आता एका नवीन आणि खतरनाक वळणावर येऊन पोहोचलं आहे. इस्रायलने बुधवारी इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर हल्ले केले. अमेरिका-इस्रायलने पहिल्यांदा इराणच्या नैसर्गिक वायूच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे इराण भडकला असून त्यांनी सौदी अरेबिया, कतर आणि यूएईच्या तेल व गॅस ठिकाणांना टार्गेट करण्याची धमकी दिली आहे. इराणी गॅस फिल्डवरील हल्ल्यासाठी कतरने इस्रायलवर टीका केली आहे. साऊथ पार्स इतका महत्वाचा का आहे? यावरील हल्ल्याला खतरनाक का म्हटलं जातय? उद्या इराणने आखाती देशांच्या गॅस फिल्डवर हल्ले केले, तर एलपीजी, एलएनजीची मोठी समस्या निर्माण होईल. भारत नैसर्गिक वायूसाठी आखाती देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

साऊथ पार्स इराणच्या महत्वाच्या ऊर्जा उत्पादन केंद्रापैकी एक आहे. याला इराणच्या अर्थव्यवस्थेचं कणा मानलं जातं. याआधी अमेरिकन सैन्याने फारसच्या खाडीत इराणचं मुख्य तेल टर्मिनल खार्ग बेटावर हल्ला केला होता. तेलनंतर गॅस फिल्डवरील हल्ल्याकडे इराणच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडण्याच रणनिती म्हणून पाहिलं जात आहे. याचे गंभीर परिणाम जगावर होऊ शकतात.

इराणसाठी साऊथ पार्स गॅस फिल्ड इतकं महत्वाच का?

साऊथ पार्स आणि नॉर्थ फिल्डला जगातील सर्वात मोठ गॅस फिल्ड मानलं जातं. फारसच्या खाडीत साऊथ पार्सला इराण आणि नॉर्थ फिल्डला कतर आहे.

जगातील जवळपास 10 ते 15 टक्के तेल साठा याच भागात आहे. इथून उत्पादन होणाऱ्या गॅसवर जगातील अनेक देश अवलंबून आहेत. वीज आणि अन्य उद्योगांसाठी हा गॅस महत्वाचा आहे.

या गॅस फिल्डचा शोध 1990 च्या दशकात लागला. जवळपास 9700 वर्ग किमीमध्ये हा गॅस पसरलेला आहे. 3700 वर्ग किमी साऊथ पार्स इराणकडे आणि उर्वरित 6 हजार वर्ग किमी कतरकडे आहे.

रॉयटर्सनुसार या संपूर्ण भागात 1800 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅस भंडार आहे. या फिल्डमधून सगळ्या जगाची 13 वर्षाची इंधनाची व्यवस्था होऊ शकते. यावरुन हे गॅस फिल्ड किती मोठं आहे ते लक्षात येतं. 35 वर्ष वीज उत्पादन चालू शकतं.

कतर याच गॅस फिल्डमुळे लिक्विड नॅचुरल गॅस (एलएनजी) सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे. त्यांनी या भागातून गॅस काढण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर करार केले आहेत.

इराणही जवळपास 700 मिलियन क्यूबिक मीटर गॅसचं रोज उत्पादन करतं. इराणसाठी हे गॅस भंडार खूप महत्वाचं आहे.

हल्ल्यानंतर आगीच्या ज्वाळा 

इराणच्या सरकारी मीडियाने विशाल ऑफशोर साऊथ पार्स नॅचुरल गॅस फिल्डवरील हल्ल्याची पुष्टी केली आहे. इराणच्या दक्षिणी बुशहर प्रांतातील असालुयेह गॅस फॅसलिटीला टार्गेट करुन हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात किती नुकसान झालय त्याची माहिती मिळालेली नाही. व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतर आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले