AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेत युवराज सिंगचे 7 शिष्य उतरणार, अभिषेक-ऋषभसह या खेळाडूंची गोलंदाजांमध्ये दहशत

सिक्सर किंग युवराज सिंगच्या तालमीत घडलेल्या खेळाडूंची दहशत पाहायला मिळत आहे. अभिषेक शर्मा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत काही खास कामगिरी राहिली नाही. पण दहशत मात्र होती. चला जाणून आयपीएल स्पर्धेत युवराज सिंगचे सात पत्ते कोणते ते..

| Updated on: Mar 19, 2026 | 10:22 PM
Share
आयपीएल स्पर्धेचं बिगुल वाजलं असून या स्पर्धेत कोणता खेळाडू चमकदार कामगिरी करणार याकडे लक्ष लागून आहे. खासकरून युवराज सिंगच्या तालमीत घडलेल्या खेळाडूंकडे लक्ष असणार आहे. आयपीएल स्पर्धेत युवराज सिंगने ट्रेनिंग दिलेल्या 7 खेळाडूंचा समावेश आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत  (Photo: Instagram)

1 / 8
अभिषेक शर्मा या यादीत आघाडीवर आहे. त्याच्या आक्रमक खेळीने त्याने लक्ष वेधून घेतलं आहे. युवराज सिंगने ट्रेनिंग दिल्यानंतर मागच्या आयपीएल पर्वात त्याच्या फलंदाजीची धार दिसून आली आहे. इतकंच काय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने आक्रमक बाणा दाखवला आहे. आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादकडून मैदानात उतरणार आहे. (Photo- IPL/BCCI)

2 / 8
टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुबमन गिलही युवराज सिंगचा शिष्य आहे. युवराजच्या तालमीत त्यालाही फलंदाजीचं बाळकडू मिळालं आहे. त्याच्यासाठी आयपीएल 2026 स्पर्धा खूपच महत्त्वाची आहे. कारण टी20 संघातील त्याची जागा त्याने गमावली आहे. नाही तर खूपच कठीण होईल. (Photo- IPL/BCCI)

3 / 8
युवराज सिंगच्या छत्रछाया संजू सॅमसनलाही लाभली आहे. तसं पाहिलं संजू सॅमसनचा पंजाब क्रिकेटशी तसा काही संबंध नाही. ना कधी आयपीएल स्पर्धेत एका संघाकडून खेळले आहेत. पण संजू सॅमसनने सांगितलं की, युवराजने त्याची मदत केली होती. वर्ल्डकपपूर्वी युवराज सिंगने त्याला फलंदाजीचे काही धडे शिकवले होते. त्याचा फायदा त्याला झाला. (Photo- Chennai Super Kings/ Facebook)

4 / 8
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ऋषभ पंतला युवराज सिंगचं मार्गदर्शन लाभलं. ऋषभ पंतने युवराजसोबत काही काळ सरावही केला.त्याचे व्हिडिओ स्वतः लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधाराने पोस्ट केले होते. या पर्वात पंतने काही विशेष कामगिरी केली, तर त्यात युवराजच्या मार्गदर्शनाची भूमिका असणार हे नक्की...(फोटो- PTI)

5 / 8
पंजाब क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज प्रभसिमरन सिंग यालाही गेल्या दोन-तीन वर्षांपासून युवराज सिंग क्रिकेटचे धडे शिकवत आहे. पंजाब किंग्ससाठी त्याने मागच्या पर्वात चांगली कामगिरी केली. पंजाबला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात प्रभसिमरनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता  पुन्हा एकदा पंजाबला विजेतेपद मिळवून देण्यासाठी तशीच कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.(फोटो- PTI)

6 / 8
युवराज सिंगने  दिल्लीच्या प्रियांश आर्यालाही फलंदाजी सुधरवण्यात मदत केली आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या सलामीवीर प्रियांश आर्याने मागील आयपीएल हंगामानंतर युवराज सिंगच्या अकादमीमध्ये काही काळ घालवला होता. त्यानंतर प्रियांशने दिल्ली संघासाठी काही चांगल्या खेळी केल्या. पण त्याची खरी कसोटी आता आयपीएलमध्ये लागणार आहे. (फोटो- PTI)

7 / 8
अर्जुन तेंडुलकरसाठी आयपीएल पर्व महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई इंडियन्ससोबत असताना चार पर्वात फारशा संधी मिळाल्या नाहीत.  यावेळी लखनौ सुपर जायंट्सकडून मैदानात उतरणार आहे. या संघात त्याला नियमित संधी मिळू शकते. त्यामुळे हे पर्व सुरु होण्यापूर्वीच अर्जुनने युवराज सिंगकडून काही टिप्स घेतल्या आहेत. (फोटो- PTI)

8 / 8
Follow Us
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत