AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Soup Recipe: हॉटेलसारखे व्हेजिटेबल सूप घरीच बनवा, डिनरसाठी बेस्ट आहे रेसिपी

जर तुम्हाला रात्रीच्या जेवणात काहीतरी हलके खाण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सूपचा पर्याय उत्तम आहे. तुम्ही घरच्या घरी हॉटेलसारखे व्हेजिटेबल सूप बनवू शकता. पाहा ही सोपी रेसिपी.

Soup Recipe: हॉटेलसारखे व्हेजिटेबल सूप घरीच बनवा, डिनरसाठी बेस्ट आहे रेसिपी
Soup Recipe:Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Oct 23, 2026 | 7:25 PM
Share

रात्रीच्या जेवणात रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी डिनरमध्ये काहीतरी वेगळे ट्राय करा. हॉटेलमध्ये मिळणारे व्हेजिटेबल सूप तुम्ही घरीही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. विविध भाज्या आणि योग्य मसाल्यांचा वापर केल्यास सूपला छान चव येते. हलके, चविष्ट आणि पौष्टिक डिनर करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे, हे सूप बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांचाही वापर करता येतो. चला तर मग, जाणून घेऊया हॉटेलसारखे व्हेजिटेबल सूप घरी बनवण्याची सोपी रेसिपी.

हे व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे

– गाजर – बीन्स – शिमला मिरची – कोबी – मटार – स्वीट कॉर्न – हिरवा कांदा – लसूण – आले – व्हिनेगर – मिक्स हर्ब्स – चिली फ्लेक्स – काळी मिरी पावडर – कॉर्न फ्लोर – पाणी – तेल – मीठ

व्हेजिटेबल सूप बनवण्याची रेसिपी

हॉटेल सारखे व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्या. नंतर एका मोठ्या कढईत थोडे तेल गरम करून त्यात ४-५ लसूण पाकळ्या, आले आणि हिरव्या कांदा परतून घ्या. आता त्यात गाजर, बीन्स, शिमला मिरची घालून मिक्स करा. हे साधारण एक मिनिट परतून घ्या. आता त्यात कोबी, मटार, स्वीट कॉर्न घालून हलके परतून घ्या. नंतर त्यात पाणी घाला. मीठ घालून नीट मिक्स करा. आता हे सूप झाकून भाज्या शिजेपर्यंत उकळून घ्या. मध्ये मध्ये ढवळा आणि चेक करा. सूपमधील भाज्या क्रंची असाव्यात, जास्त शिजवलेल्या भाजीची चव चांगली लागणार नाही. भाज्या शिजत असताना कॉर्न फ्लोअर पाण्यात मिसळून बॅटर तयार करा. भाज्या शिजल्यावर सूपमध्ये घालून घट्ट होईपर्यंत उकळून घ्या. आता व्हिनेगर, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर घाला. ते चांगले मिक्स करा. नंतर शेवटी हिरवा कांदा घाला आणि सूपचा आनंद घ्या. या सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्यांचा समावेश करू शकता आणि ज्या भाज्या आवडत नाही त्या स्किप करू शकता.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…