Diwali Recipe: दिवाळीच्या फराळात बनवा खुसखुशीत करंजी; चव अशी की प्रत्येक जण विचारेल रेसिपी!

करंजीशिवाय दिवाळीचा फराळ अपूर्ण वाटतो. तुम्ही सुद्धा दिवाळीचा फराळ बनवायला सुरूवात केली असेल तर यावेळी करंजीची ही रेसिपी ट्राय करा. सर्वांना आवडेल आणि प्रत्येक जण तुमची प्रशंसा करेल.

Diwali Recipe: दिवाळीच्या फराळात बनवा खुसखुशीत करंजी; चव अशी की प्रत्येक जण विचारेल रेसिपी!
how to make karanji
| Edited By: | Updated on: Nov 01, 2026 | 12:15 PM

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक घरात महिलांची फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरु आहे. दिवाळीचा फराळ म्हटलं की पारंपारिक करंजी आलीच. करंजी बनवायला अनेक महिलांना किचकट काम वाटते. करंजी वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या जातात. खोबरं, मावा, पीठी अशा विविध प्रकारचे सारण भरून करंजी तयार केली जाते. आज आम्ही तुम्हाला खोबरं आणि ड्राय फ्रूट्सची करंजी कशी बनावयची ते सांगत आहोत. ही करंजी खायला खूप टेस्टी आहे. अगदी काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही टेस्टी करंजी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया दिवाळीच्या फराळासाठी करंजी कशी बनवायची.

करंजी बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

– १५० ग्राम खोबरं

Loading...

– २५० ग्रॅम मैदा

– १५० मिली दूध

– १/२ टीस्पून पांढरे तीळ

– बदाम

– काजू

– मनुके

– १/२ टीस्पून वेलची पावडर

– ४ टीस्पून पिठी साखर

– १ टीस्पून तूप

– १/२ टीस्पून किसलेले जायफळ

– ६० मिली तूप

– १/४ टीस्पून मीठ

– तळण्यासाठी तेल किंवा तूप

करंजी बनवण्याची पद्धत

करंजीचे सारण तयार करण्यासाठी प्रथम जाड तळाच्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेले खोबरे हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर नारळाचा किस एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. आता कढईत तीळ टाकून त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्या आणि खोबरा किससोबत ठेवा. आता मिक्सरमध्ये बदाम, काजू बारीक करून घ्या. यानंतर त्यात किशमिश पिठी साखर, जायफळ, वेलची पावडर घालून सर्व काही चांगले मिक्स करा. तुमचे सारण तयार आहे.
आता करंजीचे पीठ तयार करण्यासाठी एका छोट्या कढईत तूप गरम करा. आता एक छोटा बाउल घ्या. त्यात गरम केलेले तूप, मैदा आणि मीठ घालून दुध टाकून कडक पीठ मळून घ्या. यानंतर हे मळलेले पीठ १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा.

आता करंजी बनवण्यासाठी प्रथम मळलेले पीठ समान भागांमध्ये विभागून घ्या आणि सुमारे ५ इंच मोठी पोळी लाटून घ्या. यानंतर या पिठाच्या पोळीमध्ये नारळाचे सारण भरून पोळीच्या सर्व कडांना पाणी लावा. आता या कडा एकत्र करा. यानंतर काटा चमच्याच्या साहाय्याने कडांवर खुणा करा. करंजी बंद करताना घट्ट बंद करण्याची विशेष काळजी घ्यावी अन्यथा तळताना करंजी फुटते आणि सारण बाहेर येऊ शकते. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. यानंतर या गरम तेलात करंजी घालून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या आणि टिश्यूपेपरवर काढा. तुम्ही तळण्यासाठी तूप सुद्धा वापरू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us