
IRCTC International Tour Package: तुम्ही फक्त बॅग भरा आणि परदेशात जाण्याची तयारी करा. कारण, आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) आता प्रवाशांना रेल्वे तसेच हवाई मार्गाने परदेशात जाण्याची संधी दिली आहे. यासाठी आकर्षक पॅकेजस आहेत, चला तर मग जाणून घेऊया.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) आता प्रवाशांना रेल्वे तसेच विमानाने परदेशात जाण्याची संधी देण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे.
IRCTC ने उन्हाळ्यासाठी खास इंटरनॅशनल टूर पॅकेज लाँच केले आहे, जे मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी खास डिझाइन करण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला अत्यंत माफक दरात परदेशात जाण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी असल्याचा दावा केला जात आहे. या पॅकेजमध्ये विमान तिकिटांबरोबरच परदेश प्रवासाचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे.
लंडन टूरसह युरोपचा समावेश
आता तुम्ही IRCTC च्या माध्यमातून बुकिंग करून परदेशातील अनोख्या पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता. प्रवाशांना कोणताही अतिरिक्त त्रास होऊ नये, अशा पद्धतीने IRCTC ने ही पॅकेजेस डिझाइन केली आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात IRCTC ने काही प्रमुख आंतरराष्ट्रीय टूर पॅकेजेसची घोषणा केली आहे. यामध्ये लंडन टूरसह युरोपचा समावेश आहे.
या पॅकेजच्या माध्यमातून प्रवासी लंडन आणि युरोपातील इतर प्रमुख शहरांना भेट देऊ शकतात. याशिवाय दुबई पॅकेज, सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटन प्रेमींसाठी नेपाळ टूर आणि श्रीलंका रामायण टूर देखील सुरू करण्यात आली आहे.
परदेशी टूर पॅकेजेस
थायलंड: 3 रात्र/4 दिवसांसाठी 47,580 रुपयांचे पॅकेज.
दक्षिण कोरिया: 7 रात्री/8 दिवसांसाठी 2,15,000 रुपयांचे पॅकेज.
श्रीलंका: 6 रात्र/7 दिवसांसाठी 65,000 रुपयांचे पॅकेज.
युरोप डिस्नेलँड: 4,12,400 रुपयांचे 14 रात्री/15 दिवसांचे पॅकेज
पॅरिस: 3,76,500 रुपयांचे 12 रात्री/13 दिवसांचे पॅकेज
नेपाळ: 62,100 रुपयांचे 5 रात्री/6 दिवसांचे पॅकेज.
भूतान: 66,900 रुपयांचे 5 रात्री/6 दिवसांचे पॅकेज
सिंगापूर-मलेशिया: 1,17,260 रुपयांचे 8 रात्री/9 दिवसांचे पॅकेज
दुबई: 94,785 रुपयांचे 5 रात्री/6 दिवसांचे पॅकेज
(स्त्रोत: IRCTC चे अधिकृत संकेतस्थळ)
IRCTC ने मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी स्वस्त प्रवास सुरू केला
IRCTC ने मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी स्पर्धात्मक किंमतीत आंतरराष्ट्रीय प्रवास पॅकेज ऑफर केले आहेत. या पॅकेजअंतर्गत प्रवाशांना प्रवासाचा सर्वांगीण अनुभव मिळणार आहे, ज्यात निवास, भोजन आणि पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
बाजारात उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांच्या तुलनेत ही पॅकेजेस परवडणारी असल्याने अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ घेता येतो. बुकिंगसाठी प्रवासी IRCTC च्या अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या काउंटरवर संपर्क साधू शकतात.