
आपल्या आयुष्यातील अनेक सवयी आपल्या आरोग्यासाठी कारणीभूत ठरत असतात. त्यातीलच एक म्हणजे आंघोळीची सवय. काहींना सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करायला आवडते. जेणेकरून त्यांना ताजेतवाने वाटते आणि अर्थातच शरीर स्वच्छ झाल्याने आरोग्य चांगले राहते. त्याच वेळी, काही लोक रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करतात, जेणेकरून शरीराला आराम मिळेल आणि ते चांगली झोप येईल. स्लीप फाउंडेशनने 2022 मध्ये अमेरिकेत एक सर्वेक्षण केले होते, त्यानुसार 42 टक्के अमेरिकन लोकांना सकाळी आंघोळ करायला आवडते जेणेकरून ते दिवसाची सुरुवात ताजी करू शकतील. तर 25 टक्के लोक रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करतात जेणेकरून ते शांत आणि तणावमुक्त झोपू शकतील.तसेच त्यांचा दिवसाचा थकवा दूर करू होईल. तर काहीजण सकाळी आणि रात्री दोन्ही वेळी आंघोळ करतात.
त्यामुळे बऱ्याचदा अनेकांना हा प्रश्न असतो की नक्की अंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती असावी? आरोग्यासाठी यातील अंघोळीच कोणती वेळ फायदेशीर ठरेल. तर चला जाणून घेऊयात.
आधी जाणून घेऊयात आंघोळीचे काय फायदे आहेत?
आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते. शरीरावरील घाम, धूळ आणि घाण निघून जाते. थकवा दूर होतो. तसेच अंघोळीमुळे बॅक्टेरिया आणि जंतू निघून जातात. शरीर स्वच्छ असल्याने आजाराचा धोका कमी होतो आणि तुमची त्वचा सुधारते. विशेषतः रात्री आंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप येते.
आंघोळ करणे केवळ शरीरासाठीच नाही तर मनासाठी देखील फायदेशीर आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे ताण आणि चिंता कमी होते. शरीरात सकारात्मक हार्मोन्स सक्रिय होतात आणि मज्जासंस्था शांत होते. थकलेल्या स्नायूंनाही गरम पाण्याने अंघोळ केल्यास आराम मिळतो.
आंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती असावी?
आंघोळ करण्याच्या योग्य वेळेबद्दल बरेच वेगवेगळी मतं आहेत. बरेच लोक असे मानतात की सकाळी आंघोळ करणे चांगले आहे, तर काही लोक असे मानतात की झोपण्यापूर्वी आंघोळ करणे चांगले आहे. प्रत्येकाची स्वतःची अशी कारणे आहेत.
रात्री ज्यांनी सकाळी आंघोळ करण्याची सवय आणि आवड असते असे लोक म्हणतात की सकाळी अंघोळ केल्याने त्यांचा दिवस ताजेतवाना आणि छान जातो. तर रात्री आंघोळ करणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की रात्री झोपण्याआधी अंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा कमी होतो, शरीरही स्वच्छ होते. त्यामुळे चांगली झोप येते.
तर जे लोक दोन्ही वेळी अंघोळ करतात त्यांच्यासाठी दोन्ही वेळी अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते तसेच शरीरावरील ताण दूर होतो.
त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरावर ही गोष्टी अवलंबून असते. ज्या त्या व्यक्तिला त्याच्या शरीरानुसार अंघोळ करण्याची योग्य वेळ आणि त्याचे फायदे माहित असतात. पण जर काहीवेळेला शरीरात बदल जाणवत असतील तर डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या.
त्वचारोगतज्ज्ञ काय म्हणतात?
अमेरिकन वेबसाइट क्लीव्हलँड क्लिनिक.ऑर्ग मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात आंघोळीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात भारतीय वंशाचे त्वचारोगतज्ज्ञांच्या मते जेव्हा तुम्ही रात्री अंथरुणावर झोपता तेव्हा त्या चादरीच्या किंवा त्या ब्लॅंकेट्सच्या घर्षणामुळे,त्यावरील धूळ आणि घाणीमुळे त्वचेची जळजळ, ऍलर्जी होते. तसेच दम्याचा त्रासही होऊ शकतो.