AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : आवळ्याचा चहा वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे! 

हिवाळा सुरू होताच वजन वाढते आणि आळस येतो. अतिरिक्त पाच मिनिटे अंथरुणावर पडल्याने तुमचे चांगल्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. सकाळच्या थंडगार वातावरणामुळे आपण व्यायाम करायला जाणे टाळतो.

Weight Loss : आवळ्याचा चहा वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे! 
चहा
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 1:06 PM
Share

मुंबई : हिवाळा (Winter) सुरू होताच वजन वाढते आणि आळस येतो. अतिरिक्त 10 मिनिटे अंथरुणावर पडल्याने तुमचे चांगल्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. सकाळच्या थंडगार वातावरणामुळे आपण व्यायाम करायला जाणे टाळतो. वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी व्यायाम आणि सकस आहाराचे पालन केले पाहिजे. पण तुम्हाला माहित आहे का की हिवाळ्यात आवळ्याचा चहा आश्चर्यकारक काम करतो.

विशेष म्हणजे आवळ्याचा चहा आजारांपासून तुमचे रक्षण करण्यास मदत करतो. आवळा हेल्थ पॉवरहाऊस आहे. अनेक दशकांपासून आवळ्याचा वापर औषध म्हणून केला जात आहे. वजन कमी करण्यासाठी आवळ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बरेच लोक आहेत ज्यांना आवळा कच्चा खायला आवडतो.

जर तुम्ही हर्बल चहाचे चाहते असाल तर तुम्ही आवळ्याचा चहा पिऊ शकता. हे चयापचय दर देखील वाढवते जे जलद वजन कमी करण्यास मदत करते. आवळा मेटाबॉलिक रेट वाढवण्यास मदत करतो. जलद चयापचय, जलद वजन कमी करण्यास मदत करते. आवळ्यामध्ये फायबर असते, जे आतड्याची हालचाल चांगली करते आणि ते बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.

आवळ्याच्या चहा पचण्यास मदत करतो आणि आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत करतो. आवळा कोलेस्ट्रॉलची पातळीही राखतो. त्यात अमिनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट असल्याने ते हृदयाचे कार्यही चालू ठेवते. आणि आवळा अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने कर्करोगाचा धोका खूप कमी होतो.

आवळ्याचा चहा तयार करण्याची पध्दत-

दोन आवळे, मध आणि एक कप पाणी आपल्याला हा चहा तयार करण्यासाठी लागणार आहे. आवळ्याचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर मंद आचेवर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाले की, त्यामध्ये बारीक केलेला आवळा घाला. पाच मिनिटे तसेच राहूद्या आणि त्यामध्ये मध मिक्स करून प्या. हा चहा दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने वजन कमी होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Holi 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम!

Skin care : ऑफिस शिफ्टमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वापरा या टिप्स, चेहरा दिसेल तजेलदार

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.