AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या गूळ आणि लिंबू पाणी! 

सध्या वजन कमी करणे खूप महत्वाचे झाले आहे. लोक आता आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे सकस आणि पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सकस आहारासोबत व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. वजन कमी करण्याच्या बाबतीत, डिटॉक्स पेय खूप उपयुक्त आहे.

Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या गूळ आणि लिंबू पाणी! 
चहा
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 10:31 AM
Share

मुंबई : सध्या वजन कमी करणे खूप महत्वाचे झाले आहे. लोक आता आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे सकस आणि पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सकस आहारासोबत व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. वजन कमी करण्याच्या बाबतीत, डिटॉक्स पेय खूप उपयुक्त आहे. हे मुक्त रॅडिकल्स काढून शरीर शुद्ध करण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. घरी उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून तुम्ही सहजपणे डिटॉक्स पेय बनवू शकता.

गूळ आणि लिंबू डिटॉक्स पेय कसे बनवायचे

यासाठी थोडा गूळ घ्या आणि उकळवा. पाणी गाळून घ्या. सामान्य तापमानाला थंड होऊ द्या. यामध्ये लिंबाचा रस एक चमचा मिक्स करा. ते मिक्स करून सेवन करा.

गूळ आणि लिंबाचे आरोग्यदायी फायदे

गुळामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, खनिजे, सेलेनियम, मॅंगनीज, तांबे आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे अनेक आजार बरे होण्यास मदत होते. तसेच सर्दी आणि फ्लूची समस्या दूर होण्यास मदत होते. गुळात अँटिऑक्सिडंट असतात. ते मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात. गूळ पचन सुधारण्यास मदत करतो.

शरीर स्वच्छ करतो.  प्रतिकारशक्ती वाढवतो आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतो. त्यामुळे गूळ आणि लिंबूपाणी यांचे मिश्रण खूप फायदेशीर आहे. शरीरात अशक्तपणा असल्यास तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. गूळ खाल्ल्याने आतडे मजबूत होतात. त्यामुळे शरीराचे तापमानही योग्य राहते.

लिंबू हे आंबट असते. लिंबाचा वापर विविध पदार्थांमध्ये केला जातो. त्यात फोलेट, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, जस्त, मॅंगनीज, प्रथिने आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. लिंबूमध्ये अपचन, मुरुम, लठ्ठपणा आणि इतर अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्याची क्षमता आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यात कॅलरीज खूप कमी असतात. हे अपचनासाठी सर्वात लोकप्रिय उपायांपैकी एक आहे. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे वारंवार होणाऱ्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Drink jaggery and lemon water every morning to lose weight)

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?