AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Benefits Of Pomegranate Juice : डाळिंबाचा रस दररोज पिण्याचे आरोग्यदायी फायदे!

डाळिंबाचा रस अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, दाहक-विरोधी आणि विषाणूविरोधी गुणांनी समृद्ध आहे. रोज एक ग्लास डाळिंबाचा रस प्यायल्याने तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. डाळिंबाचा रस पिण्याचे नेमके कोणते फायदे आहेत.

Benefits Of Pomegranate Juice : डाळिंबाचा रस दररोज पिण्याचे आरोग्यदायी फायदे!
Pomegranate Juice
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 11, 2021 | 8:08 AM
Share

मुंबई : रस पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फळांचा रस असो किंवा हिरव्या भाजीचा रस असो एक ग्लास रस आपल्याला त्वरित ताजेतवाने करू शकतो. या रसांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. (Pomegranate Juice is extremely beneficial for health)

डाळिंबाचा रस अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, दाहक-विरोधी आणि विषाणूविरोधी गुणांनी समृद्ध आहे. रोज एक ग्लास डाळिंबाचा रस प्यायल्याने तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. डाळिंबाचा रस पिण्याचे नेमके कोणते फायदे आहेत. हे आपण आज बघणार आहोत.

डाळिंबाचा रस पिण्याचे फायदे

डाळिंबाचा रस कर्करोगापासून वाचवतो – डाळिंबाच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. दररोज डाळिंबाचा रस प्यायल्याने तुम्ही कर्करोगापासून दूर राहू शकतात.

डाळिंबाचा रस – डाळिंबामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्त पातळ करण्यात मदत करतात. ज्यांच्या हृदयामध्ये किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात रक्ताची गुठळी झाली आहे. त्यांच्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्त जाड होणे आणि गुठळ्या होणे थांबते.

डाळिंबाचा रस संधिवात टाळतो – डाळिंबाच्या रसामध्ये फ्लेव्होनॉल असतात. जे हाडांना हानी पोहोचवणाऱ्या सांध्यातील दाह टाळण्यास मदत करतात.

हृदयासाठी उत्तम – अनेक अभ्यासामध्ये म्हटंले गेले आहे की, डाळिंबाचा रस तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहे. हे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते आणि रक्तवाहिन्या घट्ट होण्यास प्रतिबंध करते. हा रस नियमित प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक आणि कोलेस्टेरॉलचा विकास रोखण्यास मदत होते.

रक्तदाब कमी होतो – दररोज डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हे हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्या टाळण्यास मदत करते.

डाळिंबाचा रस संसर्गाशी लढतो – त्याच्या अँटीव्हायरल गुणधर्मांमुळे, डाळिंबाचा रस सामान्य संसर्गावर उपचार करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त, त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई असते. जे रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे पोषक असतात आणि कोणत्याही आरोग्य समस्या दूर ठेवतात.

डाळिंबाचा रस पचनाला चालना देतो – डाळिंबाच्या रसामध्ये असलेले फायबर आपल्या पाचन तंत्रासाठी खूप उपयुक्त आहे. फायबर तुमची पचनशक्ती वाढवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्या टाळते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Pomegranate Juice is extremely beneficial for health)

Follow Us
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...