कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हा’ काढा पिणे फायदेशीर, वाचा !

कोरोनाच्या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यादरम्यान आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेऊन आपण कोरोनापासून दूर राहू शकतो.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:50 AM, 3 May 2021
कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'हा' काढा पिणे फायदेशीर, वाचा !
काढा

मुंबई : कोरोनाच्या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यादरम्यान आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेऊन आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे चांगली रोगप्रतिकारक शक्ती यासाठी आपल्याला चांगला आणि हेल्ही आहार घ्यावा लागणार आहे. जेणे करून आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास काढा सांगणार आहोत. (The extract is beneficial for boosting the immune system during corona)

-दालचिनी

-वेलची

-लवंग

-हळद

-आले

-मध

हे सर्व पाण्यात उकळा आणि गाळून घ्या आणि प्या. आपण दररोज संध्याकाळी हे पिऊ शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.सर्दी, खोकला, घसा दुखणे यासारखे लक्षणेही कोरोनाची मानली जातात. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रतिजैविक असल्याने ते अँटीऑक्सिडेंट्सने परिपूर्ण आहेत. संसर्ग रोखण्याव्यतिरिक्त, श्वसनविषयक समस्या दूर करण्यात मदत होते. तसेच फुफ्फुसातील ताठर कफ काढून टाकते. हा काढा खूप फायदेशीर आहे.

तीव्र डोकेदुखी झाल्यास लवंगामध्ये चवीनुसार मीठ मिसळून, त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट दुधासह सेवन करा. याचे सेवन केल्यास डोकेदुखीपासून लवकरच आराम मिळतो. तांब्याच्या भांड्यात लवंगांची बारीक पूड करा. त्यामध्ये मध मिसळून डोळ्यात लावल्याने डोळ्यांच्या आजारांमध्ये आराम मिळतो. हे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

मसालेदार चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्याने आपले नुकसान देखील होऊ शकते. दिवसातून 1 ते 2 वेळाच लवंगयुक्त चहा प्या. जास्त चहा घेतल्यामुळे स्नायू वेदना, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी लवंगाचे जास्त सेवन करू नये. जास्त मसाले खाणे आपल्या बाळासाठी हानिकारक आहे. हा चहा प्यायल्यानंतर आपल्याला उलटी झाल्यासारखे वाटत असेल, तर तो पिऊ नका.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(The extract is beneficial for boosting the during corona)