Weight Loss | या पध्दतीने चहा तयार करा आणि आपले वाढलेले वजन झटपट कमी करा!

काळा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पाणी उकळल्यावर गॅस बंद करून त्यात चहा पत्ती टाका. 4 मिनिटे तसेच चहाला मस्त चव येईल. ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे ते देखील हा पिऊ शकतात. या चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. चयापचय वाढवण्यातही या चहाची भूमिका आहे.

Weight Loss | या पध्दतीने चहा तयार करा आणि आपले वाढलेले वजन झटपट कमी करा!
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 4:03 PM

मुंबई : गरम हवामानात कोल्ड्रिंक्स, दही आणि मिल्कशेक यांचा आहारामध्ये (Diet) मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण हे पिण्यासाठी आणि खाण्यासाठी थंड असतात. मात्र, हे सर्व जरी खरे असले तरीही एक कप चहा न पिल्याने शरीराचा थकवा दूर होत नाही. मात्र, आरोग्यासाठी काळा चहा (Tea) अधिक फायदेशीर ठरतो. पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि चहा पत्ती टाका, ​​नंतर पाच मिनिटे झाकून ठेवा. या चहामुळे सर्व थकवा नाहीसा होतो. असा एक कप चहा बनवा आणि आपला दिवसभराचा थकवा (Fatigue) दूर करा. या चहाचे नेमके कोण-कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

वाचा आरोग्यासाठी फायदेशीर असलेले चहा

चांगला चहा बनवणे ही देखील एक कला आहे. किती कप पाणी, किती चमचे चहा द्यायचे हेच अनेकांना समजत नाही. सकाळचा किंवा संध्याकाळचा चहा हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा असतो. मात्र, दुधाचा चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नाहीये. यामुळे आपण काळा चहा प्यायला हवा. जर आपल्याला सर्दी आली असेल तर या काळ्या चहामध्ये आपण तुळशीची पाने आणि आद्रक टाकूनही याचे निश्चितपणे सेवन करू शकतो.

काळा – काळा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पाणी उकळल्यावर गॅस बंद करून त्यात चहा पत्ती टाका. 4 मिनिटे तसेच चहाला मस्त चव येईल. ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे ते देखील हा पिऊ शकतात. या चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. चयापचय वाढवण्यातही या चहाची भूमिका आहे.

ग्रीन टी – आले आणि काळी मिरी ठेचून ग्रीन टी बनवा. घरात पाहुणे आले तरी तुम्ही ते बनवू शकता. अशा प्रकारे बनवलेला ग्रीन टी चविला देखील चांगली लागते. तसेच आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ग्रीन टी पिने आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.