AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते सर्वात पौष्टिक अन्न नाश्त्यामध्ये खावे. प्रथिनेयुक्त नाश्ता केल्याने आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो. इतकेच नाही तर ते वजन कमी करण्यासासाठी मदत होते.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये 'या' पदार्थांचा समावेश करा!
नाश्ता
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 10:26 AM
Share

मुंबई : सकाळचा नाश्ता (Breakfast) आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते सर्वात पौष्टिक अन्न नाश्त्यामध्ये खावे. प्रथिनेयुक्त नाश्ता केल्याने आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो. इतकेच नाही तर ते वजन कमी करण्यासासाठी आणि मधुमेहाच्या रूग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण बेसनच्या घावणचा देखील समावेश करू शकतो. बेसन हे प्रथिनांचे सर्वात महत्त्वाचे स्रोत आहे. 100 ग्रॅम पिठात 20.06 ग्रॅम फायबर, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम असते. तुम्ही पिठात तिखट, मीठ, हळद आणि इतर मसाले घालून पिठात घालू शकता. हे खाण्यासाठी पौष्टिक आणि वजन कमी करण्यातही मदत करते.

नाश्त्यामध्ये कमी कॅलरी, उच्च प्रथिने आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. अंडी आणि एवोकॅडो हे सकाळच्या नाश्त्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या दोन्हींचा देखील नाश्त्यामध्ये समावेश करा. तसेच नाश्त्यामध्ये चीजचा देखील समावेश करा. चीज हे निरोगी चरबी, कॅल्शियम आणि प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे.

ओट्स आणि दही हे दोन्ही अतिशय आरोग्यदायी पदार्थ आहेत. या दोन्हींचा आहारात समावेश करा. इतकेच नाही तर हे नियमित खाल्ल्याने वजन कमी होते. ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्स, बीटा-ग्लुकन फायबर असते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारामध्ये ओट्स आणि बेरीचा समावेश करा.

बदाम, अक्रोड यासारखा सुकामेवा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासह, सफरचंद किंवा सफरचंदचा रस नाश्त्यामध्ये देखील समाविष्ट केला जाऊ शकतो. केळी आणि संत्रा देखील नाश्त्यामध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. तुम्ही भाजलेले मखाना, बदाम, काजू खाऊ शकता.

सकाळी निरोगी नाश्त्यासाठी ओटमील खा. आपण फळांसह साधे ओटमील आणखी निरोगी बनवू शकता. हे खाल्ल्याने शरीर निरोगी राहते आणि रोग दूर जातात. ओट्समध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर असतात, जे हृदयासाठी देखील चांगले असतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली