Makeup Tips | चेहऱ्यावरील केस लपवण्याचा प्रयत्न करताय? अशाप्रकारे घ्या मेकअपची मदत!

| Updated on: Feb 14, 2021 | 2:49 PM

चेहऱ्यावर नको असलेले केस कुणालाच आवडत नाहीत. ते काढण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची या प्रक्रियांची मदत घेतात.

Makeup Tips | चेहऱ्यावरील केस लपवण्याचा प्रयत्न करताय? अशाप्रकारे घ्या मेकअपची मदत!
मेकअप टिप्स
Follow us on

मुंबई : चेहऱ्यावर नको असलेले केस कुणालाच आवडत नाहीत. ते काढण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची या प्रक्रियांची मदत घेतात. परंतु, कधीकधी कामामुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत, आपण देखील असे विचार करता की, असा एखादा कोणता मार्ग वापरला तर आपण त्याद्वारे चेहर्‍यांचे अवांछित केस काढून टाकू शकता किंवा ते लपवू शकता. तुम्हाला देखील अशा समस्या असतील, तर आता चिंतामुक्त व्हा. आम्ही आपल्यासाठी अशा मेकअप टिप्स घेऊन आलो आहोत की, ज्याचा वापर करून आपण चेहऱ्यावरील नको असलेले केस सहज लपवू शकता (Makeup Tips for hide unwanted facial hair).

बर्‍याच लोकांना असे वाटते की मेकअप करूनही चेहऱ्यावरचे केस लपत नाहीत, तर कदाचित आपण चुकीचा विचार करत आहात. मेक-अप योग्यरित्या केला तर, चेहऱ्यावरील केस आणि डाग देखील दिसणार नाहीत. चला तर, मेकअपच्या मदतीने चेहऱ्यावरील नको असलेले केस कसे लपवू शकता, ते जाणून घेऊया.

या मेकअप टिप्स ट्राय करा :

– मेकअप लावण्यापूर्वी चेहरा दूध आणि लिंबाच्या रसाने स्वच्छ करा जेणेकरून चेहर्‍यावरील केसांचा रंग नेहमीपेक्षा अधिक हलका होईल.

– यानंतर आता चेहरा व्यवस्थित मॉइश्चराइझ करा.

– आता चेहऱ्यावर प्रायमर लावा. प्रायमर लावल्याने मेकअप चांगला होतो. तसेच हा मेकअप बराच काल टिकवून ठेवण्यात देखील फायदेशीर ठरतो (Makeup Tips for hide unwanted facial hair).

– जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, मुरुम आणि पुळ्या असतील, तर प्रथम कन्सीलरचा वापर करा.

– कन्सीलर लावल्यानंतर चेहऱ्यावर व्यवस्थित फाउंडेशन लावा. यासाठी कॉटन मेकअप स्पंजचा वापर करा. यामुळे फाउंडेशन व्यवस्थित संपूर्ण चचेहऱ्यावर लावणे सोपे जाईल.

– चेहेर्‍यावरील नको असलेले केस काढून लपवण्यासाठी फाउंडेशन वापरताना अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी आपण मूस किंवा लिक्विड फाउंडेशन वापरू शकता.

– यानंतर फाउंडेशन ब्रशच्या सहाय्याने कपाळावर, गालावरचे उभार आणि नाकाच्या बाह्य स्ट्रोकवर व्यवस्थित लावून घ्या. यानंतर, जॉ लाईन, गाल आणि हनुवटीच्या भागाखाली डाउनवर्ड स्ट्रोक्स द्या.

– सामान्यत: मेकअप दरम्यान फेस पावडर वापरा. परंतु, याऐवजी ट्रांसलूसेंट पावडरने मेकअप सेट केला पाहिजे. ब्रशच्या मदतीने ते चेहऱ्यावर व्यवस्थित पसरवा आणि मग आपला चेहरा कसा चमकत आहे, ते पहा. याव्यतिरिक्त, आपला मेकअप देखील बराच काळ सेट राहतो.

(Makeup Tips for hide unwanted facial hair)

हेही वाचा :