Makeup Tips | ऑफिससाठी तयार होताना जास्त वेळ लागतोय? मग, नक्की ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!

| Updated on: Feb 16, 2021 | 11:05 AM

सकाळी गडबडीत तयार होण्यासाठी बराच वेळ लागतो. सकाळच्या वेळी आपण ऑफिसमध्ये एकदम फ्रेश दिसतो, पण संध्याकाळपर्यंत आपला चेहरा निस्तेज होऊन जातो.

Makeup Tips | ऑफिससाठी तयार होताना जास्त वेळ लागतोय? मग, नक्की ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!
मेकअप टिप्स
Follow us on

मुंबई : आपण दररोज ऑफिसला जाता आणि सकाळी गडबडीत तयार होण्यासाठी बराच वेळ लागतो. सकाळच्या वेळी आपण ऑफिसमध्ये एकदम फ्रेश दिसतो, पण संध्याकाळपर्यंत आपला चेहरा निस्तेज होऊन जातो आणि यामुळे आपल्याला कंटाळाही येऊ लागतो. परंतु, जर आपण स्किल्ड टेक्निकसह योग्य मेकअप प्रॉडक्टचा वापर केला, तर आपल्याला अशा अडचणींचा सामना करावा लागणार नाही. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला आपल्या ऑफिस लूकसाठी काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरतील…(Morning Makeup tips for office going womens)

प्रायमर योग्यरित्या वापरा

बर्‍याच वेळा असे घडते की, आपल्याला एकामागून एक मिटींग्सना जावे लागते, ज्यामुळे आपल्याला तयार होण्यास वेळ मिळत नाही आणि यामुळे आपला चेहरा आणि मेकअप निस्तेज दिसू लागतो. अशा वेळी तयार होताना, मेकअप करताना आपण प्रायमर वापरला पाहिजे. यामुळे आपला मेकअप टिकून राहील आणि आपण दिवसभर फ्रेश दिसाल.

परंतु, प्रायमर लावण्यापूर्वी आपण प्रथम तोंड धुवावे आणि नंतर त्यावर मॉइश्चरायझर लावावे, ते आपल्या त्वचेत नीट शोषले जाईपर्यंत थांबावे. त्यानंतरच प्रायमर लावावे. जर आपली त्वचा तेलकट असेल, तर मॅट प्रायमर वापरावा आणि जर आपली त्वचा कोरडी असेल तर जेल-बेस्ड प्राइमर आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल.

फाउंडेशन पेन्सिलचा वापर करा

दिवसभराच्या थकव्यामुळे, आपला चेहरा देखील निस्तेज दिसू लागतो आणि चेहर्‍यावर डार्क स्पॉट दिसू लागतात. म्हणूनच, मीटिंगमध्ये जाण्यापूर्वी फाउंडेशन पेन्सिल वापरा आणि डोळ्याजवळ व्यवस्थित ब्लेंड करा. यानंतर, काजळ आणि आयलायनरसह आपला लूक पूर्ण करा (Morning Makeup tips for office going womens).

कॉम्पॅक्ट आणि ब्लश

आपला मेकअप सेट करण्यासाठी आपण प्रथम संपूर्ण चेहऱ्यावर कॉम्पॅक्ट पावडर लावा आणि नंतरच कलर ब्लश वापरा.

मॉइश्चरायझिंग लिपस्टिकचा वापर करा

सॉफ्ट गुलाबी आणि पिच कलरची लीप शेड अशी शेड आहे, जी आपण नेहमीच ऑफिसमध्ये वापरू शकता. या शेड्स आपल्या ओठांच्या नैसर्गिक रांगासारख्याच आहेत. या आपल्याला एक छान औपचारिक रूप देतात. कोरड्या मॅट लिपस्टिकऐवजी आपण दीर्घकाळ टिकणारी मॉइश्चरायझिंग लिपस्टिक वापरावी. याव्यतिरिक्त, ती लिपस्टिक पूर्णपणे वॉटर प्रूफ असणे देखील खूप महत्वाचे आहे.

हेअर स्टाईल

आपण सकाळी ऑफिसला जाण्यासाठी खूप घाईत असता, ज्यामुळे आपण आपल्या केसांना जास्त वेळ देऊ शकत नाही, म्हणून अशावेळी आपण एक हाय पोनीटेल देखील बांधू शकता. यासह आपण त्यांना मेस्सी लूक देखील देऊ शकता. मेस्सी हेअरस्टाईल खूप रफ अँड टफ केशरचना आहे. ही हेअरस्टाईल बांधण्यास खूप सोपी आहे आणि त्यानंतर ती आपल्याला एक छान क्लासी लूक देते.

(Morning Makeup tips for office going womens)

हेही वाचा :