आता फक्त एका रुपयात तुमच्या कूलरला बनवा एसी, ही सोपी ट्रीक तुम्हाला कोणीच सांगणार नाही

अनेकदा कूलर आपल्याला पाहिजे तेवढी थंड हवा देत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या घरीच काही उपाय करू शकता. ज्यामुळे तुमचा कूलर तुम्हाला एसीपेक्षाही थंड हवा देईल. आज आम्ही तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहोत.

आता फक्त एका रुपयात तुमच्या कूलरला बनवा एसी, ही सोपी ट्रीक तुम्हाला कोणीच सांगणार नाही
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 13, 2025 | 6:39 PM

नुकताच उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात प्रचंड उष्णता असते. मात्र पावसाळ्यात देखील जेव्हा-जेव्हा ढगाळ वातावरण असते, तेव्हा प्रचंड उकाडा जाणवतो. अशा परिस्थितीमध्ये आपण एसीचा वापर करतो. मात्र ज्यांच्याकडे एसी नसतो ते थंड हवेसाठी फॅन किंवा कूलरचा वापर करतात. मात्र अनेकदा कूलर आपल्याला पाहिजे तेवढी थंड हवा देत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या घरीच काही उपाय करू शकता. ज्यामुळे तुमचा कूलर तुम्हाला एसीपेक्षाही थंड हवा देईल. आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत, ज्याचा खर्च एक रुपयापेक्षा कमी आहे. मात्र ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कूलरमधून एसीपेक्षाही थंड हवा मिळेल, तसेच तुमच्या विजेच्या बिलावरही याचा कोणताही परिणाम होणार नाही.

तुम्ही तुमच्या कूलरमध्ये बर्फासोबत दोन ते तीन चमचे मिठ टाका. यामुळे तुम्हाला तुमचं कूलर एसीपेक्षाही थंड हवा देते. तसेच याचा तुमच्या वीजबिलावर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही जेव्हा बर्फासोबत मिठ मिसळून तुमच्या कूलरमध्ये टाकाल त्यानंतर थोड्याचवेळातच तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक थंड हवा येत असल्याची जाणीव होईल, जवळपास एका एसीमधून जेवढी थंड हवा येते, तेवढीच थंड हवा तुम्हाला तुमच्या कूलरमधून येईल. अनेक जण या ट्रीकवर संशय व्यक्त करतात, मात्र ही ट्रीक काम करते. यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे, तुम्ही जेव्हा बर्फामध्ये मीठ टाकता, तेव्हा तो बर्फ अधिक वेगानं विरघळू लागतो. बर्फ वितळल्यामुळे तुम्हाला कूलरमधून एसी इतकी थंडी हवा मिळते.

मात्र हा प्रयोग करतान एक काळजी आवश्य घ्या, ती म्हणजे मिठ टाकताना ते केवळ दोन ते तीन चमचे एवढंच असावं, त्यापेक्षा अधिक असू नये, तसे केल्यास मिठाच्या पाण्यामुळे तुमच्या कूलरमधील काही इलेक्ट्रिकल पार्ट खराब होण्याचा धोका असतो. तर काही लोखंडांच्या पार्टवर यामुळे गंज चढतो. त्यामुळे तुमच्या कूलरमध्ये बर्फ टाकताना फक्त दोन ते तीन चमचे एवढंच मिठ त्यामध्ये टाका, आणि एसीपेक्षाही थंड हवेचा अनुभव घ्या.