
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी लोकं वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करत असतात. काही लोकं भात खाणे टाळतात तर काही लोकं खूप व्यायाम करतात. पण तरी देखील अनेकांना यश मिळत नाही. मग ते कंटाळून या गोष्टी करणे सोडून देतात. पण योग्य आहार घेतला तर तुम्ही वजन नियंत्रणात आणू शकता. तुम्हाला जर तुमच्या लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुम्ही पपईचे सेवन करु शकता. पपई खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी पपईचे सेवन कसे करावे आणि वजन कमी करण्याव्यतिरिक्त पपई खाण्याचे इतर कोणते फायदे आहेत जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी पपईचा ज्युस तुम्ही घेऊ शकता. पपईमध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स चरबी कमी करण्यास मदत करतात आणि चयापचय वाढवतात.
न्याहारीमध्ये पिकलेली पपई खाल्ल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी पपईचे तुकडे करून त्यावर काळे मीठ आणि ठेचलेली काळी मिरी शिंपडा आणि खा.
वजन जर नियंत्रणात ठेवायचे असेल तर दह्यासोबत पपई खाऊ शकतो. हे खाण्यास चवदार तर आहेच पण पचनसंस्थेसाठीही फायदेशीर ठरू शकते. न्याहारी, मध्य-सकाळच्या नाश्ता किंवा संध्याकाळच्या नाश्तासाठी दही आणि पपई खाऊ शकता. यासाठी एक वाटी दही घ्या आणि त्यात पिकलेल्या पपईचे तुकडे तेवढेच घ्या. तुमच्या आवडीनुसार काही ड्रायफ्रुट्स घालून खा.
पपईमध्ये फायबर आढळून येते जे पचनसंस्थेच्या कार्यात मदत करते. पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडत नाही. मधुमेहाच्या रूग्णांसाठी देखील ते चांगले आहे. शरीरातील सूज कमी करण्यात ही पपई मदत करते. पपई रक्तातील साखरेची पातळी कमी करते.