AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips : त्वचेसाठी पपई अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

पपई आरोग्यासाठी खूप चांगली आहे, पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात.

Beauty Tips : त्वचेसाठी पपई अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 06, 2021 | 8:59 AM
Share

मुंबई : पपई आरोग्यासाठी खूप चांगली आहे, पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात. बरेच लोक आपल्या आहारात नियमितपणे पपईचा समावेश करतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की पपई फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. पपई आपल्या त्वचेला लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. (Papaya is extremely beneficial for the skin)

पपई हे एक नैसर्गिक एक्सफोलीएट आहे जे अँटी-एजिंगचे काम करते. एक्सफोलीएटिंग प्रक्रिया आपली मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला आतून निरोगी बनवते. एक्सफोलिएशनसाठी कच्चा पपई एका भांड्यात स्मॅश करून घ्या आणि हा कुस्करलेला गर चेहऱ्यावर मास्क म्हणून लावा. हा पपईचा फेस मास्क वाळवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. पपईचे वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

पपईमध्ये व्हिटामिन ए, आणि व्हिटामिन सी असतं. हे तत्व त्वचेची टॅनिंग कमी करण्यात मदत करतात. पपईमध्ये पपाइन प्रथिने असतात. केसांची वाढ होण्यात याचा उपयोग होतो. यामुळे केस गळण्याची समस्याही संपते. पपईमध्ये खोबरे तेल किंवा व्हिनेगर मिक्स करुन डोक्यावर लावल्यास डोक्यातील कोंडाची समस्या दूर होते. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तुम्ही पपईचा फेसपॅकही लावू शकता. पपई अँटी-एजिंगच्या समस्येवर मात करण्यास मदत करते.

पपईच्या बिया खाण्यापूर्वी त्या कशा खाव्यात आणि त्यांचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे, हे माहित असणे आवश्यक आहे. पपईच्या बियांचे सेवन करण्यापूर्वी आपण आपल्या आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांशी बोलले पाहिजे. ते सांगतील त्याप्रमाणेच पुढील कृती करावी. तथापि, पपईच्या बिया सामान्यत: वाटून, किंवा रस करून सेवन करतात येतात. पपईच्या बिया थेट चावून खाणे टाळावे. याशिवाय तुम्ही पपईच्या बियांसोबत मध किंवा गुळ देखील खाऊ शकता.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Snoring Issue | जाणून घ्या का उद्भवते घोरण्याची समस्या? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि शांत झोपेचा आनंद घ्या…

(Papaya is extremely beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली