Peanuts Benefits | दूध, बदाम आणि तुपाची कमतरता पूर्ण करतील शेंगदाणे, ‘या’ पद्धतीने करा सेवन!

| Updated on: Feb 02, 2021 | 3:15 PM

एक लिटर दुधातून आपल्या जितके प्रोटीन मिळते, तितकेच प्रोटीन आपल्याल फक्त 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्याने मिळू शकते.

Peanuts Benefits | दूध, बदाम आणि तुपाची कमतरता पूर्ण करतील शेंगदाणे, ‘या’ पद्धतीने करा सेवन!
एक लिटर दुधातून आपल्या जितके प्रोटीन मिळते, तितकेच प्रोटीन आपल्याल फक्त 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्याने मिळू शकते.
Follow us on

मुंबई : पोहा, कटलेट आणि चटणीपासून ते अनेक खाद्यपदार्थांची चव वाढवण्यात ‘शेंगदाणा’ महत्त्वाची भूमिका बजावतो. शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत, हे देखील आपल्याला ठाऊक नसेल. तज्ज्ञांच्या मते शेंगदाण्यात 25 टक्क्यांहून अधिक प्रथिने असतात. एक लिटर दुधातून आपल्या जितके प्रोटीन मिळते, तितकेच प्रोटीन आपल्याल फक्त 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्याने मिळू शकते. ज्या लोकांना पचनासंदर्भात समस्या आहेत, अशा लोकांना शेंगदाणे खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटी होऊ शकते. मात्र, शेंगदाणे खाण्याची पद्धत बदलल्यास आपणास गॅसचा त्रास होणार नाही. चला तर, जाणून घेऊया शेंगदाण्यांच्या फायद्यांविषयी…(Peanuts can fulfill lack of proteins in body)

शेंगदाणे खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचा उत्तम स्त्रोत मानला जातो. जर, तुम्हाला फार महागडे ड्राय फ्रूट्स खाणे शक्य नसेल तर नियमित शेंगदाण्याचे सेवन करा. तज्ज्ञांच्या मते, आपल्याला 250 ग्रॅम भुईमुगात जितके प्रोटीन आणि व्हिटामिन असतात, तितके 250 ग्रॅम मांसतही सापडत नाहीत. त्याच वेळी, एक अंड आणि दुधातील प्रथिने आपल्याला काही शेंगदाणे देऊ शकतात. जर एखादी व्यक्ती नियमितपणे शेंगदाणे खात असेल तर त्यांच्या शरीराला आवश्यक दूध, बदाम आणि तूप यांचे पोषण मिळते.

कंबर आणि सांधे दुखीमध्ये आराम

यात पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, कॅल्शियम, लोह, सेलेनियम इत्यादी अनेक पौष्टिक घटक आढळतात. जर हिवाळ्यात शेंगदाण्याबरोबर गुळाचे सेवन केले तर कंबर आणि सांधे दुखीमध्ये आराम मिळतो. तसेच, शरीरातील कॅल्शियमची कमतरता देखील दूर होते.

गरिबांचे बदाम म्हणून प्रख्यात शेंगदाणे

शेंगदाण्याला गरिबांचे बदाम देखील म्हणतात. कारण ते मेंदूला शक्ती देतात आणि स्मरणशक्ती वाढवतात. तसेच ते बदामा इतके महागही नसतात. भुईमूग अर्थात शेंगदाणे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. तसेच, शरीरात ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो (Peanuts can fulfill lack of proteins in body).

रोग प्रतिकारक शक्ती वाढते

त्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडंट्स, लोह, फोलेट, कॅल्शियम आणि जस्त शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. शेंगदाण्याचा सेवन रक्तातील साखर नियंत्रित करते. याद्वारे, आपण मधुमेहासारख्या आजारांपासून सुरक्षित राहू शकतात.

या गोष्टी लक्षात ठेवा!

जर तुम्हाला शेंगदाण्यातील घटकांचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल, तर ते भिजवून ठेवा आणि मग खा. शेंगदाणे बर्‍याचदा हिवाळ्यामध्ये त्याच्या उबदार परिणामामुळेच खाल्ले जातात. परंतु, भिजलेली शेंगदाणे कोणत्याही ऋतूत खाऊ शकता.

किमान पन्नास ग्रॅम शेंगदाणे दररोज रिकाम्या पोटी खा. यानंतर, सुमारे एक तासासाठी काहीही खाऊ नका. यामुळे आरोग्याच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. भिजलेल्या शेंगदाण्यामुळे तुमची पचन क्रिया सुधारते, जेणेकरून गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होत नाही. हे खाल्ल्याने शरीरातील रक्त कमी होते आणि रक्त परिसंचरण सुरळीत राहते.

(टीप : डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(Peanuts can fulfill lack of proteins in the body)

हेही वाचा :