Skin Care Tips | स्वयंपाक घरातील ‘दालचिनी’ देईल चमकदार चेहरा, या टिप्स नक्की वापरून पाहा!  

दालचिनी आपल्या अन्नाची चव वाढवते आणि आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते.

Skin Care Tips | स्वयंपाक घरातील ‘दालचिनी’ देईल चमकदार चेहरा, या टिप्स नक्की वापरून पाहा!  
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 5:45 PM

मुंबई : व्यस्त जीवनशैलीमुळे आपण सगळेच त्वचेची काळजी  (Skin Care) घेण्यासाठी महागातल्या महाग उत्पादनांचा वापर करतो. प्रदूषण आणि तणावामुळे आपला कोमल, नाजूक चेहरा काळवंडून जातो. आजच्या काळात आरोग्याकडे जेवढे लक्ष दिले जाते तितकीच त्वचेची काळजी घेण्याकडेही अनेकांचा कल असतो. महागडी उत्पादने वापरण्याऐवजी अशावेळी आपण स्वयंपाक घरातील दालचिनीचा (Cinnamon) वापरू शकता. दालचिनी आपल्या अन्नाची चव वाढवते आणि आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते (Skin Care Benefits Of Cinnamon).

दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपल्या चेहर्‍यावरील मुरुम कमी होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर, दालचिनी आपले सौंदर्य वाढविण्याचे काम देखील करते. वाढत्या वयात त्वचेवरील सुरकुत्या कमी करुन, त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यात दालचिनी लाभदायक ठरते. त्वचेचा पोत जाणून घेऊन, या टिप्स वापरून तुम्हीही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.

तेलकट त्वचा

तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांना मुरुमांचा त्रास अधिक असतो. त्वचा तेलकट असल्याने चेहऱ्यावर प्रचंड मुरुमे येतात. तेलकट त्वचेला सतत मॉइश्चराइज करणे आवश्यक आहे. अशावेळी आपण दालचिनी आणि मध यांचा फेसपॅक तयार करून तो लावू शकता. हा फेसपॅक लावल्यावर 15 मिनिटांनी पाण्याने धुवून टाकावा. परंतु, चेहऱ्यावर हा पॅक लावण्यापूर्वी तो आपल्याला त्वचेला हानी पोहचवणार नाही याची खात्री करून घ्या (Skin Care Benefits Of Cinnamon).

कोरडी त्वचा

कोरडी त्वचा असणे म्हणजे आपल्या त्वचेला मॉइश्चराइज करण्याची आवश्यकता आहे. दालचिनी आपला रक्त प्रवाह वाढवते आणि आपली त्वचा चमकदार बनवते. यासाठी आपल्याला एक चमचा कुस्करलेल्या केळ्यात, एक चमचा दही आणि अर्धा चमचा दालचिनी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट काहीवेळ चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवून टाका. केळी आणि दही आपल्या त्वचेला मॉइश्चराइझ करते. यामुळे त्वचेची गेलेली चमक पुन्हा परत येण्यास मदत होईल.

वाढत्या वयात चमकदार त्वचा

दालचिनीमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. जे वाढत्या वयात आपल्या चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. दालचिनी त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यात फायदेशीर ठरू शकते. यासाठी एक चमचा दालचिनीची पावडरमध्ये 2 चमचे नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. या पेस्ट सुमारे 15 मिनिटे चेहऱ्याला मालिश करा आणि नंतर पाण्याने चेहरा धुवून टाका. हे क्रिया आपल्या त्वचेला मॉइश्चराइज करेल आणि त्वचा नितळ ठेवण्यास मदत करेल.

(Skin Care Benefits Of Cinnamon)

टीप : कुठल्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.