Skin Care | सणासुदीच्या काळात ‘या’ चार गोष्टी मुरुमांपासून सुरक्षित ठेवतील!

वाढते प्रदूषण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या त्वचेकडे म्हणावे तसे लक्ष देणे होत नाही. चेहर्‍यावर मुरुमांचा त्रास नेहमीच असतो.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:30 PM, 24 Nov 2020
skin care

मुंबई : वाढते प्रदूषण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या त्वचेकडे म्हणावे तसे लक्ष देणे होत नाही. चेहर्‍यावर मुरुमांचा त्रास नेहमीच असतो. बाहेर कुठेतरी जाण्यासाठी आपण प्लॅन करतो. मात्र, चेहर्‍यावरील मुरुमामुळे जाण्याच्या अगोदरच आपला मुड खराब होतो. आपल्या सर्वांना हे माहित आहे की, निरोगी आहार आणि पाणी पिण्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होऊ शकतो. परंतु, अशा उपायात बराच वेळ लागतो. आपण या चेहऱ्यावरील मुरूमाला अतिशय सोप्या पध्दतीने दूर करू शकतो. (skin care tips to get rid pimples)
कोरफड जेल
कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफड लावल्यानंतर आपली त्वचा मऊ पडते. कोरफड लावल्याने मुरूमाचे डाग देखील दिसत नाहीत. जर आपल्याला मुरुमांचा त्रास होत असेल तर, रात्री कोरफड किंवा कोरफडीचे जेल लावा.

टी-ट्री ऑइल
टी-ट्री ऑइलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. थोड्याशा नारळाच्या तेलामध्ये दोन थेंब टी-ट्री तेल घाला आणि चांगले एकजीव करा आणि मुरुमावर लावा, थोडा वेळानंतर कोमट पाण्याने धुवा.
मध
मध आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीइन्फ्लेमेटरी असते. ज्यामुळे मुरुम कमी होण्यास मदत होते. मुरुमावर एक-दोन थेंब मध लावा आणि रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी पाण्याने चेहरा धुवा.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे मुरुमांचा दाह कमी होतो. ग्रीन टी त्वचेसाठी खूप चांगली आहे. ग्रीन टीच्या पिशव्या पाण्यात उकळा आणि थंड होऊ द्या. या चहाच्या पिशव्या थंड झाल्यावर मुरुमांवर लावा.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आपण सर्वकाही वापरण्यापूर्वी स्वच्छ करून घेत आहोत. अशा परिस्थितीत आपण आपले मेकअपचे साहित्य कसे स्वच्छ करणार? ज्या प्रकारे आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण आपली त्वचा स्वच्छ ठेवतो आणि लक्ष देतो. त्याच प्रमाणे, आपण आपले मेकअप ब्रश, मस्कारा, लिपस्टिक, प्लिकर्स देखील स्वच्छ ठेवले पाहिजे आणि कोरोना काळात विशेष काळजी घेतली पाहिजे.

संबंधित बातम्या :

Weight Loss | वजन कमी करताय? या 5 गोष्टी आहारात नक्की समाविष्ट करा!

(skin care tips to get rid pimples)