वजन कमी करण्यासाठी उपवासाचे शरीरावर कोणकोणते घातक परिणाम?

वजन कमी करण्यासाठी तुम्हीही अशाप्रकारे उपवास (fasting for Weight loss)  करत असाल, तर तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी उपवासाचे शरीरावर कोणकोणते घातक परिणाम?

मुंबई : वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी महिला सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यासाठी डायटींगपासून (Dieting) अगदी उपाशी (Fasting) राहण्यापर्यंत सर्व काही करतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हीही अशाप्रकारे उपवास (fasting for Weight loss)  करत असाल, तर तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी उपवासाचा पर्याय अवलंबणार असाल, तर त्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा (Medical Specialist) नक्की सल्ला घ्या.

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणार असाल, तर त्याचा उलट परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. उपाशी राहण्याचा सर्वात मोठा फटका शरीरातील मेटाबॉलिजमवर पडतो. त्यामुळे उपाशी राहण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्यापूर्वी तुम्ही योग्य तो आहार निवडावा. जर तुम्ही आहारात फळ, भाजी, बिया, टोफू, मासे, गव्हाचा ब्रेड याचा समावेश करावा. यातील कोणताही आहार तुम्हाला कठीण वाटतं असल्यास तुम्ही न्यूट्रिशनची मदत घ्या.

जर तुम्ही उपवास करणार असाल, तर तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावं लागतं. दिवसभर उपाशी राहिल्याने डोकं दुखणे, जळजळणे यासारखे दुष्परिणाम शरीरावर जाणवतात. उपाशी राहिल्याने तुमचा मू़डही बऱ्याचदा खराब होतो. तसेच शरीराला मिळाणारी पोषक तत्त्वे कमी प्रमाणात मिळाल्याने तुमच्या कामावरही त्याचा परिणाम जाणवतो.

आपल्या शरीरात 20 टक्के पाणी हे खाद्यपदार्थांद्वारे पोहोचते. याचाच अर्थ, जर तुम्ही दिवसभर काहीही न खाण्याचा निर्णय घेतला, तर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते. तोंड सुकणे, लघवी कमी होणे, पिवळ्या रंगाची लघवी होणे, स्नायू दुखणे यासारखी अनेक लक्षण दिसतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *